घरदेश-विदेशई-सिगरेट्सवर बंदी घालण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

ई-सिगरेट्सवर बंदी घालण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

Subscribe

ई-सिगरेट्सचे उत्पादन आणि त्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.

बदलत्या काळाप्रमाणे सिगारेटचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये ई-सिगरेटचा वापर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या सिगारेटमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असून या सिगारेटवर बंदी आणावी अशी याचिका न्यायालयात करण्यात आली होती. याअंतर्गत ई-सिगरेट्सवरचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी ठेवण्यात आली आहे. ई-सिगरेट्स प्रकृतीस अपाय कारक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभू बखरु यांनी हे आदेश दिले आहेत. तंबाखूमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते यामुळे ई-सिगरेट्सचा पर्याय काढण्यात आला होता. मात्र ई-सिगरेटही आरोग्याला अपायकारक असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे व्हेपिंग

ई-सिगरेट्स ओढण्यामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका धूम्रपानाच्या तुलनेत ५ टक्क्यांहून अधिक नाही हे ई-सिगरेट्सबद्दलच्या वाढत्या सार्वमतातून स्पष्ट होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे धूम्रपानामध्ये असलेले ज्वलन ई-सिगरेट्समध्ये नाही. या ज्वलनामुळेच हानीकारण विषारी वायू व कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक निर्माण होतात. ई-सिगरेट किंवा इलेक्ट्रॉनिक सिगरेट हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे उपकरण तंबाखूच्या धूम्रपानामुळे येणारी भावना निर्माण करते. ई-सिगरेट्सच्या वापराला सामान्यपणे “व्हेपिंग” असे म्हटले जाते. ही सिगरेट निकोटिन, प्रॉपिलीन ग्लायकोल, ग्लिसरिन आणि फ्लेवरिंग घटक वापरून तयार केली जाते. २००३ साली चीनमधील औषधकंपनी “हॉन लिक”ने आधुनिक ई-सिगरेटचा शोध लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -