घरदेश-विदेशe-Shram Registration: ई- श्रम कार्ड बनवताना कसा अपलोड कराल फोटो? जाणून घ्या...

e-Shram Registration: ई- श्रम कार्ड बनवताना कसा अपलोड कराल फोटो? जाणून घ्या प्रोसेस

Subscribe

यात योजनेत नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. या पोर्टलच्या आकडेवारीनुसार, जवळपास ५२.९३ टक्के महिला आणि ४७.०६ टक्के पुरुषांनी यावर नोंदणी केली आहे.

केंद्र सरकारकडून गरीबांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणल्या जातात. यात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे ई- श्रम कार्ड योजना. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण १८ कोटी लोकांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे.

यात योजनेत नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. या पोर्टलच्या आकडेवारीनुसार, जवळपास ५२.९३ टक्के महिला आणि ४७.०६ टक्के पुरुषांनी यावर नोंदणी केली आहे.

- Advertisement -

तीन प्रकारे तुम्ही ई-श्रममध्ये नोंदणी करु शकता. पहिला प्रकार म्हणजे सेल्फ रजिस्ट्रेशन. यात अधिकृत वेबसाईटवरून जाऊन तुम्ही स्वत: नोंदणी करु शकता. दुसरा प्रकार म्हणजे कॉमन सर्विस सेंटर आणि तिसरा प्रकार म्हणजे स्टेट सेवा केंद्र याठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी करु शकता. स्व-नोंदणी ही सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे.

स्व-नोंदणी करताना तुमचा फोटो अपलोड करायचा असेल तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करु शकता.

- Advertisement -

ई- श्रम कार्ड फोटो अपलोड करण्याची ऑनलाईन प्रोसेस

  1. सर्वप्रथम e-shram च्या अधिकृत वेबसाइट eshram.gov.in वर जा आणि ‘e-SHRAM Registration’ या लिंकवर क्लिक करा.

2. यानंतर तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

3. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.

4. ओटीपी टाकून, फोटो अपलोड करणे आणि इतर सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरा.

5. आता तुमची ई-श्रम कार्ड नोंदणी पूर्ण होईल.


1 कोटी 34 लाखांचा चोरीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत !

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -