घरताज्या घडामोडीCorona Vaccination: लवकरच कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनला बाजारात उपलब्ध होण्याची मिळणार मंजूरी; जाणून घ्या...

Corona Vaccination: लवकरच कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनला बाजारात उपलब्ध होण्याची मिळणार मंजूरी; जाणून घ्या काय असेल किंमत?

Subscribe

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लस लवकरच बाजारात उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे बाजारात आल्यानंतर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीचा प्रति डोस किती रुपयाला असेल जाणून घ्या.

देशात आता कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस बाजारात उपलब्ध होणार आहेत. माहितीनुसार, लवकरच भारताच्या औषध नियामकाकडून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस बाजारात आणण्यासाठी मंजूरी दिली जाईल. या लसींच्या प्रति डोसची किंमत २७५ रुपये आणि अतिरिक्त सेवा शुल्क १५० रुपये असण्याची शक्यता आहे. नॅशनल फार्मस्युटिकल प्राईसिंग अथॉरिटीला (NPPA) लस परवडण्याजोगी बनवण्यासाठी लसींच्या किंमती मर्यादित करण्याच्या दिशेने काम सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

- Advertisement -

अजूनपर्यंत खासगी रुग्णालयात कोव्हॅक्सिनची किंमत १ हजार २०० रुपये प्रति डोस आणि कोविशिल्डची किंमत ७८० रुपये प्रति डोस आहे. या किंमतीमध्ये १५० रुपये सेवा शुल्काचा देखील समावेश आहे. देशात फक्त या दोन्ही लसी आपात्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या कोरोनावरील विषय तज्ज्ञ समितीने १९ जानेवारीला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती.

माहितीनुसार, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला (National Pharmaceutical Pricing Authority, NPPA) लस सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे लसीची किंमत प्रति डोस २७५ आणि १५० रुपये अथिरिक्त सेवा शुल्कासह मर्यादित केली जाण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी २५ ऑक्टोबरला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला एक निवेदन दिले होते, ज्यामध्ये कोविशिल्ड लसीचा नियमित बाजारात उतरवण्यास मंजूरी देण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

एवढेच नाही तर काही आठवड्यापूर्वी भारत बायोटेकचे संचालक वी. कृष्ण मोहन यांनी कोव्हॅक्सिन नियमित बाजारात उतरवण्याची मागणी करत प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह रसायनशास्त्र, सूत्रीकरण आणि नियंत्रणाची संपूर्ण माहिती सादर केली होती. देशात गेल्या वर्षी ३ जानेवारीला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली गेली होती.


हेही वाचा – रेड वाइन प्यायल्याने कोरोना संक्रमणाचा धोका 17 टक्क्यांनी कमी ; संशोधनातून माहिती समोर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -