राष्ट्रपती भवनाच्या गच्चीत सापडला ट्रॅकिंग डिव्हाईस बसवलेला गरुड

eagle with a tracking device was found on the terrace of Rashtrapati Bhavan
राष्ट्रपती भवनाच्या गच्चीत सापडला ट्रॅकिंग डिव्हाईस बसवलेला गरूड

सोमवारी राष्ट्रपती भवनाच्या (Rashtrapati Bhavan) गच्चीवर एक गरुड (eagle) आढळून आला. या गरुडावर ट्रॅकिंग (tracking device) डिव्हाइस बसवल्याचे आढळले. या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ उडाली. हा गरुड पावसामुळे आणि जोरदार वादळामुळे जखमी होऊन पडला होता. राष्ट्रपती भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याची तपासणी केली.

पावसामुळे गरूड झाला जखमी –

दिल्लीतील काही भागात सोमवारी जोरदार पाऊस झाला. या पावसात हा गरूड (eagle) जखमी झाला आणि राष्ट्रपती भवनाच्या गच्चीवर पडाल होता. त्याला उचलण्यासाठी राष्ट्रपती (Rashtrapati Bhavan) भवनातील अधिकारी गेले तेव्हा त्यांना गरुडाला (eagle) जोडलेले सेटलाईट यंत्र (tracking device) आढळून आले. अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेला याबाबत माहिती दिली. यानंतर गरुडावर (eagle) बसवण्यात आलेल्या यंत्राची तपासणी करण्यात आली

चौकशीनंतर सत्य आले समोर –

या डिव्हाईससोबत एक चिठ्ठी सापडली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले चौकशीनंतर यात काहीच संशयास्पद आढळले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या मुंबईतल्या एका अधिकाऱ्यांनी पक्षाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी व अन्य माहिती मिळवण्यासाठी हे यंत्र बसवल्याचे समोर आले आहे.