घरCORONA UPDATEOmicron variant : ओमिक्रॉन वेगाने वाढतानाच, लसीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करतोय, WHO ची...

Omicron variant : ओमिक्रॉन वेगाने वाढतानाच, लसीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करतोय, WHO ची माहिती

Subscribe

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटने थैमान घातले आहे. भारतासह जवळपास सर्वाधिक देशांमध्ये ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे डेल्टानंतर ओमिक्रॉन विषाणूने जगाला चिंतेत टाकले आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही ओमिक्रॉन व्हेरीएंटबाबत एक चिंता वाढवणारी माहिती जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी (१२ डिसेंबर) सांगितले की, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंट डेल्टा व्हेरीएंटपेक्षा जास्त संक्रमिक करणारा विषाणू आहे. यामुळे लसीकरणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.

ओमिक्रॉनच्या सध्या उपलब्ध डेटाचे विश्लेषण करत जागतिक आरोग्य संघटनेने हा निष्कर्ष काढला आहे. यात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर लक्षणे नसलेले सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचेही WHO ने निदर्शनास आणून दिले आहे.

- Advertisement -

सुरुवातीच्या पुराव्यांचा आधार घेत WHO ने म्हटले की, ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे संक्रमणाविरुद्ध लढताना लसीचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे ओमिक्रॉन व्हेरीएंट डेल्टा व्हेरीएंटलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. तसेच ओमिक्रॉनचा डेल्टापेक्षा वेगाने सामुदायिक प्रसार होण्याची शक्यता आहे.

WHO ने सांगितले की, ९ डिसेंबरपर्यंत जगभरातील ६३ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरीएंटचा प्रसार झाला आहे. यात दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनचा वेगाने प्रसार होतोय. मात्र ब्रिटनमध्ये घातक ठरलेल्या डेल्टा व्हेरीएंटचा प्रभाव सर्वाधिक होत आहे. आणि हाच व्हेरीएंट भारतात कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून आले असे WHO ने नमूद केले आहे.

- Advertisement -

सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे की नाही हे ठोसपणे सांगू शकत नाही. कारण याचे अनेक भिन्न भिन्न पुरावे समोर आले आहेत. सध्या ओमिक्रॉनचा संसर्ग हा वेगाने होत असला तरी सध्या सौम्य आणि लक्षणे नसलेली प्रकरणे आढळली आहेत. मात्र उपलब्ध डेटानुसार अद्याप अतिगंभीर किंवा रुग्णालयात भरती करावे अशी कोणतीच प्रकरणं समोर आलेली नाहीत.

२४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून वेगाने परसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे सर्वच देशांनी हायअलर्ट जारी केला आहे. तसेच व्हेरीएंटचा प्रसार रोखण्य़ासाठी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध आणली आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची तात्काळ तपासणी केली जातेय.

ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशातील नागरिकांना ओमिक्रॉन टाळण्यासाठी तिसरा डोस घेण्याचे आवाहन करत आहेत. ओमिक्रॉन संसर्गामध्ये हलका ताप, अंगदुखी आणि कोरडा खोकला यासारखी लक्षणे दिसल्याचा दावा जगभरातील तज्ज्ञ करत आहेत. या नव्या व्हेरिएंटनमध्ये चव किंवा वास कमी होणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.


Modi in Varanasi : पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर; गंगा आरती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन, असा असेल मोदींचा दौरा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -