घरटेक-वेक'PCO' प्रमाणे आता WIFI द्वारे कमवा पैसै !

‘PCO’ प्रमाणे आता WIFI द्वारे कमवा पैसै !

Subscribe

'वायफाय' ही आता काळाची गरज बनली आहे. वाय-फायची वाढती मागणी लक्षात घेता, लवकरच एखाद्या PCO बूथप्रमाणे सार्वजनिक डेटा ऑफिस सुरु करण्यात येणार आहे.

आपल्या देशात वाय-फाय वापरणाऱ्यांची समस्या खूप मोठी आहे. बहुतांशी ऑफिसेसमध्ये वायफायचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून काही निवडक रेल्वे स्थानंकावरही फ्री वायफाय सुरु करण्यात आलं आहे. थोडक्यात ‘वायफाय’ ही काळाची गरज बनली आहे. आता लवकरच आपल्या देशात वाय-फाय कनेक्शन शेअर करुन पैसै कमवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे सार्वजनिक डेटा ऑफिसच्या व्यावसिक वापराला दूरसंचार विभाग लवकरच मंजुरी देणार आहे.

कुणीही सुरु करु शकतं ‘डेटा ऑफिस’

या सुविधेअंतर्गत देशातील कोणतीही व्यक्ती एखाद्या PCO बूथप्रमाणे सार्वजनिक डेटा ऑफिस सुरु करु शकते. या ऑफिसमध्ये अगदी २ रुपयांपासून ते २० रुपयापर्यंतची कुपन्स पुरवली जातील. या कुपन्सचा वापर करुन अनुक्रमे अर्धा तास ते संपूर्ण दिवसापर्यंत वाय-फायचा वापर करु शकतात. वाय-फाय वापरणारी व्यक्ती व्यक्ती ‘पेटीएम’ किंवा ‘भीम अॅप’च्या माध्यमातून पैसै भरु शकते.

- Advertisement -

रोजगाराची संधी होणार उपलब्ध

देशभरात जागोजागी अशी सार्वजनिक डेटा ऑफिसेस सुरु झाल्यास, तरुणांना मोठ्याप्रमाणावर रोजगार मिळू शकतो. सरकारने प्रायोगिक तत्तावर अशी ४१५ डेटा ऑफिसेस सुरु केली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लवकरच त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली जातील आणि त्यानंतर व्यावसायिक पातळीवर ही डेटा ऑफिस सुरु केली जातील. यामुळे देशातील बेरोजगारांसाठी रोजगार

‘नाव’ आणि ‘लोगो’साठी जाहीर केलं बक्षीस

दरम्यान सुरु करण्यात येणाऱ्या या सार्वजनिक डेटा ऑफिससाठी ‘नाव’ आणि ‘लोगो’ सुचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ‘ट्राय’कडून (TRAI) जनतेला हे आवाहन करण्यात आलं आहे. सर्वसामान्य लोकांना रुचेल आणि सार्वजनिक डेटा सर्व्हिसला शोभेल अशाप्रकरचा लोगो आणि नावं सुचवण्यात येण्यांचं आवाहन ट्रायने केलं आहे. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीचा लोगो आणि नाव अंतिमत: निश्चित केले जाईल त्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचं, जाहीर करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -