अंदमान-निकोबार बेट भूकंपाने हादरले, तीव्रता ५ रिश्टर स्केल

सकाळी सहा वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.०५  इतकी होती. तर, सकाळी ८.०५ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याला दुजोरा दिला आहे. भूकंपाची खोली 30 किमी होती.

Earthquake: Earthquake tremors felt from Jammu and Kashmir to Delhi

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अंदमान निकोबार बेट आज भूकंपाने हादरले. सकाळी सहा वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.०५  इतकी होती. तर, सकाळी ८.०५ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याला दुजोरा दिला आहे. भूकंपाची खोली 30 किमी होती. (Earth Quake In Portblair In Andaman Nicobar Island Magnitude 5.05 Occurred)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरपासून २१५ किलोमीटरपासून लांब होते. भूकंपची तीव्रता अधिक असली तरीही अद्यापही वित्तहानीचे वृत्त आलेले नाही. तसेच, ४ जुलै रोजीही अंदमान-निकोबार येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते.


भूकंप का होतात जाणून घ्या?

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50 किमी जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. या टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या जागी कंपन करत राहतात आणि जेव्हा ही प्लेट खूप कंपन करते तेव्हा भूकंप जाणवतो.

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्या?

भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वी थरथरू लागते. या ठिकाणी किंवा आसपासच्या भागात भूकंपाचा प्रभाव अधिक असतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला, तर आजूबाजूच्या 40 किमीच्या त्रिज्येत हा हादरा अधिक तीव्र असतो.