घरदेश-विदेशदिल्लीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानमधील हिंदू कुश केंद्रबिंदू

दिल्लीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानमधील हिंदू कुश केंद्रबिंदू

Subscribe

या भूकंपाचे केंद्र स्थान अफागिणस्तान असल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. याआधी नेपाळ येथे भूकंप आला होता. त्यावेळीही दिल्लीला त्याचे धक्के जाणवले होते. कारण भारताची टेक्टोनिक प्लेट ही युरेशियन व तिबेटीयन प्लेटसी धडकत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना भूकंपाचे धक्के जाणवतात. तसेच पाकिस्तानापासून उत्तर भारतातील भागात भूकंप येणे ही सर्वसामान्य घटना मानली जाते. 

नवी दिल्लीः गुरुवारी संध्याकाळी दिल्ली व एनसीआरला भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान येथील हिंदू कुश भाग होता. ५.९ रिश्टर स्केल एवढी भूंकपाची तीव्रता होती. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरून गेली. या घटनेत कोणतीही हानी झाल्याची तूर्त तरी माहिती नाही. याआधीही दिल्ली व एनसीआरला भूंकपाचे धक्के बसले होते.

या भूकंपाचे केंद्र स्थान अफागिणस्तान असल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. याआधी नेपाळ येथे भूकंप आला होता. त्यावेळीही दिल्लीला त्याचे धक्के जाणवले होते. कारण भारताची टेक्टोनिक प्लेट ही युरेशियन व तिबेटीयन प्लेटला धडकत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना भूकंपाचे धक्के जाणवतात. तसेच पाकिस्तानापासून उत्तर भारतातील भागात भूकंप येणे ही सर्वसामान्य घटना मानली जाते.

- Advertisement -

भूंकपाचे धक्के ५ रेश्टर स्केल असतील तर त्याची तीव्रता दहा मिनिटांत ५०० किमी अंतर पार करते. दिल्लीत भूंकप झाला तर त्याचे धक्के अवघ्या दहा मिनिटांत लखनऊलाही जाणवतात. त्याची तीव्रता कमी झाली तरी लखनऊला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू शकतात. एवढचं काय तर भोपाळपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवू शकतात.

प्रो. कमल यांनी सांगितले की, तुम्हाला कोणी धक्का दिला आणि समोर भिंत असेल तर तुम्ही त्या धक्क्याचा प्रतिकार करता. तुमच्यात प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. हीच शक्ती तुम्हाला ताकद देत असते. अशाच प्रकारे आशिया खंडातील देशांतील भूगर्भात सध्या हालचाली सुरु आहेत. भारताची टेक्टोनिक प्लेट वेगाने तिबेटीयन देशांच्या भूमीला धडकत आहे. त्यामुळे वारंवार भूंकप होत आहेत. काहीवेळा भूंकपाची तीव्रता अधिक असते. नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भूंकपाची माहिती अवघ्या ३० सेकंदात मिळाली होती.

- Advertisement -

भूकंपाचे धक्के बसणार याची आगाऊ माहिती देणारे तंत्र विकसित झालेले नाही. मात्र त्याची शक्यता वर्तवली जाते. भूगर्भातील हालचाली व वातावरणातील बदल याचा आधार घेत भूकंपाची शक्यता वर्तवली जाते. वेळीच त्या भागाला सर्तकतेचा इशारा दिला जातो. जेणेकरुन त्या भागात जीवीत हानी होऊ नये, असेही प्रो. कमल यांनी सांगतिले,

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -