दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी होती. याचे केंद्र नेपाळमधील जुमला येथून 69 किमी अंतरावर होते. मात्र, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के सौम्य जणवले.

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी होती. याचे केंद्र नेपाळमधील जुमला येथून 69 किमी अंतरावर होते. मात्र, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के सौम्य जणवले. सुदैवाने यात जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. (earthquake in delhi ncr uttarakhand and nepal)

उत्तराखंडच्या पिथौरागढमध्येही भूकंप

याआधी बुधवारी दुपारी दीड वाजता उत्तराखंडच्या पिथौरागढमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. येथील भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी अंतरावर तर पिथौरागढपासून 143 किमी अंतरावर होता. त्या घटनेतही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के अशा वेळी आले आहेत, जेव्हा या महिन्यात तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाने मोठी हानी केली आहे. 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 46000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे 2 लाखांहून अधिक अपार्टमेंट उद्ध्वस्त झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्की-सीरिया सीमेवर होता.

भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता

नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने ही माहिती दिली आहे. बुधवारी दुपारी १.४५ वाजता नेपाळच्या बाजुरामध्ये भूकंप झाल्याचे केंद्राने सांगितले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 मोजली गेली.

नेपाळमध्ये यापूर्वीही भूकंप झाला होता

नुकताच नेपाळमध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपामुळे तीन घरांची पडझड झाली होती. बाजुरा येथील हिमाली ग्राम परिषद आणि हुमलाच्या ताजकोट ग्रामपरिषदेचा सीमावर्ती भाग भूकंपाचा केंद्रबिंदू होता.


हेही वाचा – पक्षाविरोधात मतदान करणे म्हणजे दुसऱ्या पक्षात सामील होण्याचा कट; सिब्बल यांचा आरोप