जम्मू – काश्मीरमध्ये पाच दिवसांत भूकंपाचे 13 धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

earthquake in palghar nashik updates 3 6 reister scale shocks citizens panic maharashtra

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही भूकंप सकाळी साडेचार तासांत झाले असून त्याची तीव्रता अनुक्रमे 2.9 आणि 3.4 इतकी नोंदवली गेली. मंगळवारपासून जम्मूच्या डोडा, किश्तवार, कटरा (रियासी) आणि उधमपूर जिल्ह्यात एकूण 13 कमी तीव्रतेचे भूकंप झाले आहेत. सुदैवाने या भूकंपांमुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप तर समोर आलेली नाही.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहाटे 4.32 वाजता झालेल्या पहिल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भद्रवाह शहरापासून 26 किमी लांब आणि दक्षिण-पश्चिमेस 10 किमी खोलीवर होता. दुसरा भूकंप सकाळी 9.06 वाजता झाला, त्याचा केंद्रबिंदू डोडापासून पाच किलोमीटर दक्षिण-पूर्वेला पाच किलोमीटर खोलीवर होता.

याआधी जम्मू-काश्मीरमधील कटरा येथून 62 किमी अंतरावर शुक्रवारी पहाटे 3.28 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. गेल्या चार दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही 8 वी वेळ आहे.

जम्मू-काश्मीरमधील भूकंपाचा पहिला हादरा मंगळवारी पहाटे 2:20 वाजता कटरा पूर्वेला जाणवला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी होती. 2.6 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप जम्मूच्या डोडा जिल्ह्याच्या 9.5 किमी ईशान्येला पहाटे 3.21 वाजता झाला. मंगळवारी पहाटे 3.44 वाजता उधमपूरपासून 29 किमी पूर्वेला 2.8 रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप झाला. बुधवारी सकाळी 8.03 वाजता उधमपूरपासून 26 किमी आग्नेय दिशेला 2.9 रिश्टर स्केलचा चौथा भूकंप झाला. जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळीही भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यानंतर शुक्रवारी पहाटे 7 वाजता भूकंपाचा 8 वा धक्का जाणवला.साई मंदिर वादावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत; विखे पाटलांची माहिती