घरदेश-विदेशजम्मू काश्मीरला भूकंपाचे धक्के

जम्मू काश्मीरला भूकंपाचे धक्के

Subscribe

जम्मूमधील काही जिल्ह्यामध्ये आज पहाटे भूकंपाटे धक्के जाणवले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरीकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

जम्मू-काश्मीरमधील काही भागांमध्ये आज, रविवारी सकाळी भूकंपाकचे धक्के जाणवले. राज्यातील दक्षिणी भागातील काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. यामुळे सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हवामान खात्याच्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.६ इतकी असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी साधारण सव्वा पाचच्या सुमारास जम्मू – काश्मीरच्या किश्तवाड, डोडा, राजौरी, पुंछ आणि रामबन जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सुदैवाने भूकंपाच्या धक्क्यात कोणत्याही प्रकारची जीविक तसेच मालमत्तेची हानी झालेली नाही.

- Advertisement -

१२ सप्टेंबरलाही जाणवले होते भूकंपाचे धक्के

यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये १२ सप्टेंबर २०१८ रोजीदेखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान, जम्मू – काश्मीर व्यतिरिक्त हरियाणा आणि पंजाबमधील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. तर त्या आधी १० सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील मेरठ आणि राजधनी दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -