घरदेश-विदेशभूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान पुन्हा हादरले, १०७ किमी खोल केंद्रबिंदू

भूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान पुन्हा हादरले, १०७ किमी खोल केंद्रबिंदू

Subscribe

तुर्की आणि सीरियानंतर आता अफगाणिस्तानात गेल्या दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. अफगाणिस्तानातील फैजाबाद जिल्ह्यात आज सकाळी ७.०६ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केलवर मोजण्यात आली आहे. फैजाबादपासून २८५ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू १०७ किमी खोल होता.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीही अफगाणिस्तानात भूकंप आला होता. २३ फेब्रुवारी रोजी अवघ्या 18 मिनिटांत दोन मोठे हादरे अफगाणिस्तानला बसले. पहिल्यांदा भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली, तर दुसऱ्यांदा भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर स्केल होती. याशिवाय ताजिकिस्तानमधील मुर्गोबपासून 67 किमी पश्चिमेला 6.8 रिश्टर स्केलचा भूकंपही झाला. तर, २२ फेब्रुवाीर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.

- Advertisement -


तुर्की आणि सीरिया देश भूकंपाने (Earthquakes) हादरले आहेत. या दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुर्की (Turkey) आणि सीरियाच्या (Syria) भूकंपानंतर जगभरातील देशांनी धास्ती घेतली असून त्यानुसार उपाययोजनांना सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे भारतातही भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी संशोधन सुरू झाले आहे.

दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के
बुधवारी दुपारी दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी होती. याचे केंद्र नेपाळमधील जुम्लापासून 69 किमी अंतरावर होते. मात्र, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के सौम्य जणवले. सुदैवाने यात जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. त्याआधी, गुजरात सीमावर्ती भागात राशा, रघतविहीर, फणसपाडा येथे शनिवारी (दि.१८) व रविवारी (दि.१९) तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते.

- Advertisement -

तुर्कीत भूकंपामुळे हाहाकार
तुर्कस्तान आणि शेजारील सीरियामध्ये 6 फेब्रुवारी भूकंपामुळे हाहाकार माजला होता. या दोन देशांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 मोजली गेली. या भूकंपात 41 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. नंतरच्या एक-दोन दिवसात अनेक वेळा भूकंपाचे आणखी सौम्य धक्के जाणवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -