Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के, 4.9 रिश्टर स्केलची तीव्रता

अंदमान-निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के, 4.9 रिश्टर स्केलची तीव्रता

Subscribe

अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांच्या 108 किमी उत्तर-पूर्व दिगलीपूर येथे दुपारी 12:43 वाजता 4.9 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती.

भूकंप का होतात जाणून घ्या?

- Advertisement -

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फेअर म्हणतात. हा 50 किमी जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. या टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या जागी कंपन करत राहतात आणि जेव्हा ही प्लेट खूप कंपन करते तेव्हा भूकंप जाणवतो.

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता ?

- Advertisement -

भूकंपाचा केंद्रबिंदू असे ठिकाण आहे, ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वी हलायला लागते. या ठिकाणी किंवा आसपासच्या भागात भूकंपाचा प्रभाव अधिक असतो. जर रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला, तर आजूबाजूच्या 40 किमीच्या त्रिज्येत हा हादरा अधिक तीव्र असतो.


हेही वाचा : विमानात प्रवासी अश्लील फोटो पाठवत असल्याने वैमानिकाचा संताप, केलं असं काही…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -