भूकंपाच्या धक्क्याने हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि आसाम हादरले

दिल्लीनंतर आता हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. हरियाणा, आसाम आणि जम्मू-काश्मीरमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

earthquake tremors in delhi ncr
दिल्लीत भूकंपाचे धक्के

दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीर, हरियाणा, आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पहाटे ५.१५ वाजता भूकंपाचा धक्का बसला याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल ऐवढी होती. हरियाणामध्ये पहाटे ५.४३ वाजता भूकंपाचा धक्का बसला असून याची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल ऐवढी होती. भूकंपाचा क्रेंद्रबिंदू हरियाणातील इज्जर येथे होता. तर आसाममध्ये देखील भूकंपाचा तीव्र धक्का बसला असून त्याची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल ऐवढी होती. दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये लागोपाठ दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवले होते.

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

हरियाणामध्ये पहाटेच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पहाटेच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसल्याने सगळे जण झोपेत होते. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर हरियाणातील नागरीक झोपेतून उठून घराबाहेर पळाले. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता जास्त होती मात्र यामध्ये जिवितहानी आणि काहीच नुकसान झाले नाही.

आसाम, बिहार, पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के

आसाममध्ये देखील भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल ऐवढी होती. या भूकंपाचे धक्के बिहार, पंजाब देखील जाणवले. आसाममध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. २५ ते ३० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. आसाम, बिहार आणि पंजाबमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.

दिल्लीत दोन वेळा जाणवले भूकंपाचे धक्के

दोन दिवसापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये लागोपाठ दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याच केंद्रबिंदू मेरठ आणि हरियाणाच्या सीमवेर असल्याचे सांगितले गेले होते. हरियाणाच्या इज्जर जिल्ह्यामध्ये सोमवारी सौम्य भूकंपाचा धक्का बसला. सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल ऐवढी होती. त्याचा केंद्रबिंदू सतहपासून १० किलोमीटर जमीन खाली होता. या भूकंपाचा धक्का राजधानी दिल्लीमध्ये देखील जाणवला होता.