घरताज्या घडामोडीदिल्लीसह उत्तर भारतात भूकंप, नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंप, नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

Subscribe

दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दोन वेळा झालेल्या जोरदार भूकंपामुळे अनेक वसाहती आणि परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाच्या हादऱ्यामुळे अनेक जण घराबाहेर पडले. मंगळवारी मध्यरात्री 1:58 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दोन वेळा झालेल्या जोरदार भूकंपामुळे अनेक वसाहती आणि परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाच्या हादऱ्यामुळे अनेक जण घराबाहेर पडले. मंगळवारी मध्यरात्री 1:58 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. शिवाय, भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. डोटी जिल्ह्यात घर कोसळल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. (Earthquake Tremors Felt In Delhi NCR On Tuesday Night)

भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही लोकांनी त्यांच्या घरांच्या भिंती तपासल्या आणि भूकंपाची खातरजमा केली. तज्ज्ञांच्या मते, भूकंपाची तीव्रता 6.3 पेक्षा जास्त होती. दिल्ली-एनसीआरशिवाय उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या लगतच्या जिल्ह्यांमध्येही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 6.3 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा सर्वाधिक फटका नेपाळमध्ये बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळ, भारताशिवाय चीनमध्येही भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. नेपाळ आणि मणिपूरमध्ये दुपारी 1.57 वाजताच्या दरम्यान 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती.

लखनौ, मुरादाबाद, मेरठ बरेली आदी शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी एनसीआरच्या फरिदाबाद, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

- Advertisement -

या भूकंपाचा नेपाळमध्ये जोरदार हादरा बसला आहे. गेल्या 24 तासांत भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. पहिला रात्री 8.52 वाजता आला, ज्याची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी होती. दुसरा 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप रात्री 9.41 वाजता झाला. यानंतर रात्री उशिरा 1 वाजून 57 मिनिटांनी तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले. नेपाळमध्ये 2.12 वाजता आणखी एक भूकंप झाला, डोटी जिल्ह्यात एक घर कोसळले, 3 जणांचा मृत्यू झाला.

यापूर्वी गेल्या 24 तासांत 5 रिश्टर स्केलपेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप झाले आहेत, ज्याचा केंद्रबिंदू नेपाळ आणि मिझोराम आहे. दिल्ली भूकंपाच्या झोन 4 मध्ये आहे. इथे पाचच्या वरचा भूकंप इमारतींसाठी धोकादायक मानला जातो. रात्री उशिरा झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती.


हेही वाचा – अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस निश्चित

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -