घरदेश-विदेशEarthquake Delhi : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंप, 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ जाणवले...

Earthquake Delhi : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंप, 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ जाणवले धक्के; लोक पळाले घराबाहेर

Subscribe

दिल्ली एनसीआर येथे मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री जवळपास सव्वा दहाच्या दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहार येथे भूकंपाचे धक्के बसले

दिल्ली – दिल्ली एनसीआर येथे मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री जवळपास सव्वा दहाच्या दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहार येथे भूकंपाचे धक्के बसले आहे. याची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याचं सांगितलं गेलं आहे. भारतासह पाकिस्तान, कझाकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाचे झटके जाणवले आहेत. सीस्मॉलॉजी विभागाच्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानपासून 90 किलोमीटर दूर कालाफगन येथे होते.

हेही वाचा : मी आईच्या मृतदेहाचे तुकडे केले, रिंपलच्या जबाबाने गुंतागुंतीची झाली केस

- Advertisement -


भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडले. गेल्या एक महिन्यात दिल्लीत भूकंपाचे झटके जाणवण्याची ही तिसरी वेळ आहे.
जयपूरसह राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहा दरम्यान हे झटके जाणवले. जयपूर शहरातील अनेक लोक भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरुन घराबाहेर पडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -