दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग येथे होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अरुणाचलमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 एवढी होती. आज सकाळी 10.31 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी 9 नोव्हेंबरच्या रात्री दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि बिहारमध्ये हे धक्के जाणवले.

लखनौ, मुरादाबाद, मेरठ, बरेली आदी शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी एनसीआरच्या फरिदाबाद, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, या ठिकाणांवरून एकही अपघात झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे.

नागरिकांच्या प्रतिकिया…

नोएडामध्ये काम करणाऱ्या आकाश आणि विजय यांनी सांगितले की, मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा माझी सीट हलू लागली. ऑफिसमध्ये भूकंपाचा अलार्म वाजला आणि त्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो. साधारण 10 मिनिटांनी आम्ही परत आत गेलो.

नेपाळमधील डोटी जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू

नेपाळमधील डोटी जिल्ह्यात भूकंपानंतर पहाटे 2:12 च्या सुमारास घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक भागात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 3.15 वाजता पुन्हा 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले.


हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या सुटकेनंतर ठाण्यातील डीसीपींची थेट वाहतूक शाखेत बदली