घरताज्या घडामोडीडार्क चॉकलेट खा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढ, केंद्र सरकारचा सल्ला

डार्क चॉकलेट खा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढ, केंद्र सरकारचा सल्ला

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात न येताच देशात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता भारतीय वैज्ञानिकांकडून वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थिती लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गृह विलगीकरणात बरे होणाऱ्या रुग्णांसाठी नवा डाएट प्लॅन शेअर केला आहे. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी खाद्यपदार्थांची यादी जाहीर केली आहे. याच माध्यमातून केंद्र सरकारने डार्क चॉकलेट खा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा असा मोलाचा सल्ला दिला आहे. ही चॉकलेटप्रेमींसाठी खूप आनंदाची बाब आहे.

- Advertisement -

कोरोना संकटात सरकारचे आरोग्यवर्धक डाएट

ज्या चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण ७० टक्के आहे, असे चॉकलेट थोड्या प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते, असा सल्ला देण्यात आला आहे. यासह सकस आहार, हळदयुक्त दूधाचे, मासे, अंडी खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने नेमकं काय खाण्याचा सल्ला दिला?

आहारामध्ये नाचणी, ओट्सचा समावेश करा. चिकन, मासे, अंडी, सोयाबीन, सुकामेवा पनीर असे प्रोटीनयुक्त पदार्थ खा. बदाम, आक्रोड, ऑलिव्ह ऑईल, राईचं तेल अशा स्निग्ध पदार्थांचे सेवन करा. आरोग्यासाठी नियमित योग आणि श्वसनाचे व्यायामही करा. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव नियंत्रणासाठी डार्क चॉकलेट खा आणि हळदयुक्त दूध प्या.

- Advertisement -

हेही वाचा – कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या Antigen टेस्टला अखेर अमेरिकन CDC कडून मान्यता


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -