इबोलाचं औषध गुणकारी; ६८ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागत नाही

कोरोनाच्या गंभीर रूग्णांना रेमेडिसिव्हिर औषध दिलं तर कमी प्रमाणात व्हेंटिलेटरची गरज लागेल, असा दावा द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या जर्नलने केला आहे.

ebola vaccine

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. मात्र, प्रत्येक देशात प्राथमिक स्तरावर उपचार करत आहेत. कोरोनामुळे अनेकांना व्हेंटिलेटरची गरज भासते. श्वासोच्छवास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, इबोलाच्या औषधाने रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागत नसल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या गंभीर रूग्णांना रेमेडिसिव्हिर औषध दिलं तर कमी प्रमाणात व्हेंटिलेटरची गरज लागेल. ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’च्या मते, रेमेडिसिव्हिरच्या वापरामुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांपैकी ६८ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागत नाही आहे. हे औषध इबोला साथीच्या रोगावेळी आलं होतं. सध्या हे औषध भारतात तयार होत नाही, पण येत्या काही दिवसांत सरकार औषध निर्मिती कंपन्यांशी संपर्क साधू शकते.

५३ गंभीर रुग्णांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ३६ रुग्णांमध्ये (६८ टक्के) औषधाचा परिणाम दिसून आला. २५ जानेवारी ते ७ मार्च या कालावधीत १० दिवस रुग्णांना हे औषध देण्यात आलं. पहिल्या दिवशी २०० मिलीग्रामची मात्रा दिली गेली आणि उर्वरित ९ दिवस १०० मिलीग्रामची मात्रा दिली. व्हेंटिलेटरची ९४ टक्के गरज लागणाऱ्या रुग्णांनाच हे औषधे दिलं गेलं.


हेही वाचा – क्वारंटाईन सेंटरमध्येही भेदभाव; दलित महिलेने तयार केलेलं जेवण नाकारलं


औषधाच्या पुनरावलोकनासाठी अभ्यास सुरू

सोमवारी इंडियन आयसीएमआरचे चीफ एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. रमन आर. गंगखेडकर भविष्यात रेमेडिसिव्हिर औषधाचा भारतात वापर करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, हे औषध इबोलामध्ये वापरण्यात आलं होतं. त्यावेळी त्याचे परिणाम चांगले आले होते. मात्र, कोरोनाच्या बाबतीत अद्याप क्लिनिकल चाचण्या केल्या गेलेल्या नाहीत, परंतु आढावा अभ्यास केला गेला आहे.

हे औषध भारतात उपलब्ध नाही

यामध्ये दोन-तृतियांश म्हणजेच कोरोनातील तीनपैकी दोन रुग्ण ज्यांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असते ते कमी झालं आहे. गिलियार्ड कंपनी हे औषध बनवतं. हे औषध आतापर्यंत भारतात उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सहकार्याने आयसीएमआर घेत असलेल्या चाचण्यांमध्ये रेमेडीसिव्हिरचा समावेश आहे.