घरताज्या घडामोडीकोरोना लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा, केंद्रीय निवडणुक आयोगाचा केंद्र सरकारला आदेश

कोरोना लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा, केंद्रीय निवडणुक आयोगाचा केंद्र सरकारला आदेश

Subscribe

देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहीर केल्या होत्या. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी याठिकाणी होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता या राज्यात लागू झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोना लसीकरणाच्या (covid 19 certificate) प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवा असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. हे आदेश देतानाच आचारसंहिता भंग होणार नाही याचीच खबरदारी म्हणून आदेश दिल्याचे केंद्रामार्फत स्पष्ट करण्यत आले आहे. याआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे असे सांगितले होते. टीएमसीचे खासदार असलेल्या डेरेक ऑब्रिएन यांनीही पंतप्रधानांचा कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो हा सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करण्यासारखा असल्याचे म्हटले होते. त्यांनी एक पत्र लिहून निवडणुक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.

केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पंतप्रधानांचा फोटा, स्वाक्षरी आणि संदेश नमुद करून पंतप्रधानांच्या पदाचा आणि सत्तेचा दुरूपयोग केला आहे. त्यासोबतच कोरोना लस निर्मात्यांचे श्रेय घेण्याचा हा प्रकार असल्याचे ऑब्रिएन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना काळात श्रम घेतलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सेवकांचे हे श्रेय असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे. या पत्रानंतरच केंद्रीय निवडणुक आयोगाने या संपुर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय निवणडणुक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहित म्हटले आहे की निवडणुकांसाठीची नियमावलीचे पालन करणे अपेक्षित आहे. पोल पॅनेलने आरोग्य मंत्रालयाला म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाहिरात करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. पण पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणुक आयोगाने हे पत्र लिहितानाच कोणत्याच व्यक्तीचा किंवा नावाचा उल्लेख आपल्या पत्रात केलेला नाही. केंद्रीय निवडणुक आयोगाने असेही सुचवले आहे की पंतप्रधानांचा फोटा हा विधानसभा निवडणुक असलेल्या राज्यात वापरला जाऊ नये. पण इतर राज्यात मात्र हे प्रमाणपत्र देण्यासाठी काहीच हरकत नसल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे.

- Advertisement -

पाच राज्यांमध्ये येत्या २७ मार्चपासून विधानसभा निवडणुकांना सुरूवात होत आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुक पार पडणार आहे. आसाममध्ये तीन टप्प्यात, तामिळनाडूत आणि केरळमध्ये एक तर पुद्दुचेरीतही एक दिवस अशा पद्धतीने निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. या पाचही ठिकाणी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी ही २६ फेब्रुवारीपासून लागु करण्यात आली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -