Homeदेश-विदेशECI Foundation Day : भारतातील मतदारांची संख्या 99.1 कोटींवर, निवडणूक आयोगाची माहिती

ECI Foundation Day : भारतातील मतदारांची संख्या 99.1 कोटींवर, निवडणूक आयोगाची माहिती

Subscribe

18 ते 29 वयोगटातील 21.7 कोटी मतदार आहेत आणि मतदार लिंग गुणोत्तर सहा अंकांनी लाढला आहे. 2024मध्ये 948 असलेले हे गुणोत्तर 2025मध्ये 954 झाले आहे.

(ECI Foundation Day) नवी दिल्ली : देशामध्ये 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक आयोगाच्या या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील मतदारांची संख्या आता 99.1 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांची संख्या 96.88 कोटी होती. तर दुसरीकडे, देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही संकल्पना रुजणार आहे. सध्या यासंबंधीचे विधेयक संयुक्त संसदीय समिकडे विचाराधीन आहे. हे लागू करण्यासाठी मोदी सरकार गंभीर असून विरोधकांचा काही प्रमाणात विरोध आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 7 जानेवारी 2025 रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. भारत लवकरच एक अब्जाहून अधिक मतदारांचा एक नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार त्यावेळी म्हणाले होते. मतदार यादी 6 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. आपली मतदारसंख्या 99 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आपण लवकरच एक अब्ज मतदारांचा देश बनणार आहोत, जो मतदानाचा आणखी एक विक्रम असेल, असे राजीव कुमार म्हणाले होते.

हेही वाचा – Chitra Wagh Vs Aaditya Thackeray : अपात्र बहिणींची संख्या वाढणार? चित्रा वाघांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

तर, राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, मतदार यादीत तरुणाई आणि स्त्री-पुरुष यामध्ये संतलुन पाहायला मिळते. 18 ते 29 वयोगटातील 21.7 कोटी मतदार आहेत आणि मतदार लिंग गुणोत्तर सहा अंकांनी वाढले आहे. 2024मध्ये 948 असलेले हे गुणोत्तर 2025मध्ये 954 झाले आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि पंजाब या राज्यांनी आज जाहीर केलेल्या एसएसआरच्या (विशेष सारांश सुधारणा) घोषणेनंतर, आपण पहिल्यांदाच 99 कोटी मतदारांचा आकडा ओलांडू, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. महिला मतदारांची संख्याही सुमारे 48 कोटी होईल, असा दावाही त्यांनी केला.

वन नेशन वन इलेक्शन विधेयक

बहुचर्चित वन नेशन वन इलेक्शन विधेयक हे 17 डिसेंबर 2024 रोजी संसदेत सदर करण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या 17व्या दिवशी विरोधकांच्या गदारोळात हे विधयक सादर करण्यात आले. हे विधायक घटनाविरोधी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. नंतर ते पुन्हा संयुक्त संसदीय समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आले आहे. (ECI Foundation Day : Number of voters in India at 99.1 crore)

हेही वाचा – Bangladesh Crisis : बांगलादेशात सत्तापालट होऊनही परिस्थिती जैसे थेच, विद्यार्थी नेत्यांना पश्चाताप