Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशRahul Gandhi : लेखी उत्तर देऊ, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपावरून आयोगाचे राहुल गांधींना उत्तर

Rahul Gandhi : लेखी उत्तर देऊ, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपावरून आयोगाचे राहुल गांधींना उत्तर

Subscribe

ECI Vs Rahul Gandhi : नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गोंधळावरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच कॉंग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी या प्रकरणी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्यावर होणाऱ्या अशा आरोपांचे आम्ही लेखी उत्तर देऊ, असे आयोगाने म्हटने आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने विचारलेले प्रश्न, त्यांचे सल्ले तसेच त्यांची भूमिका आमच्यादृष्टीने महत्त्वाची असल्याचेही आयोगाने सांगितले आहे. (eci on rahul gandhi allegations of irregularities in maharashtra elections reply in writing)

सोशल मीडिया X वर निवडणूक आयोगाने एक पोस्ट केली आहे. आमच्यासाठी मतदार सर्वोच्च आहे. तर राजकीय पक्ष हे आमच्यासाठी स्टेक होल्डर आहेत, असे आयोगाने म्हटले आहे. राजकीय पक्षांनी दिलेले सल्ले, त्यांचे प्रश्न देखील आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. देशभरातील निवडणुकीत राबवण्यात आलेल्या प्रक्रियेदरम्यान ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्याच आधारे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.

त्यापूर्वी सकाळी राहुल गांधी यांनी इंडि आघाडीतील अन्य दोन घटक पक्ष – शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधींसोबत एक पत्रकार परिषद घेतली. यात गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत, यात गोंधळ झाल्याचे सांगितले. तसेच, या निवडणुकीत आयोगाने आपले काम व्यवस्थित केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. येथील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Mumbai : कोस्टल रोडवरील स्पोर्ट्स गाड्यांचे थैमान, आवाजामुळे रहिवाशांची झोपमोड

महाविकास आघाडीतील आपल्या सहकाऱ्यांसोबत ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. महाराष्ट्रातील निवडणुकीत खूप गोंधळ झाला आहे. तेथील मतदार आणि मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे. याचा तपास करण्यासाठी आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांची गरज आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही निवडणूक आयोगाकडे मागितली आहेत. मात्र, त्यांच्याकडून आम्हाला अद्याप उत्तर मिळालेले नाही. म्हणजेच, त्यांनी जे काही केले आहे, त्यात गडबड आहे हे निश्चित. आम्ही हवेत आरोप केलेले नाहीत तर आम्ही त्याचे पुरावे देत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा – Fadnavis On Gandhi : ही तर आणखी एका फेक नरेटिव्हची तयारी, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस –