Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशRajya Sabha By-Poll : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; 20 डिसेंबरला...

Rajya Sabha By-Poll : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; 20 डिसेंबरला मतदान

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी याचे निकालही घोषित होतील.

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. त्यासोबतच लोकसभेच्या काही जागांसाठी देखील पोटनिवडणुका घेण्यात आल्या. त्यापाठोपाठ आता राज्यसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. (eci releases notification for the 6 vacant seats of rajya sabha by polls will be held on 20th December)

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी याचे निकालही घोषित होतील.

- Advertisement -

यात आंध्र प्रदेशातील तीन जागा आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल, हरयाणा आणि ओडिशातील एक – एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान सदस्यांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या पोटनिवडणुकी संबंधित अधिसूचना 3 डिसेंबर रोजी जारी केली जाईल. नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर असून 11 डिसेंबर रोजी अर्जांची पडताळणी केली जाईल. 13 डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्यात येतील आणि मतदान 20 डिसेंबरला होणार आहे. 24 डिसेंबर पूर्वी निवडणूक आयोगाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

- Advertisement -

वेंकटरमण राव मोपिदेवी, बीधा मस्थान राव यादव आणि रायगा कृष्णय्या या वायएसआरपीच्या सदस्यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिल्याने आंध्रप्रदेशात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. यादव आणि कृष्णय्या यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 21 जून 2028 रोजी, तर मोपिदेवी यांचा कार्यकाळ 21 जून 2026 रोजी संपणार होता. सध्या वायएसआर जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाचे राज्यसभेत केवळ आठ सदस्य आहेत.

ओडिशात सुजीतकुमार यांनी बीजू जनता दलाचे सदस्यत्व सोडल्याने येथे एक जागा रिक्त झाली. नंतर पक्षाने त्यांना काढून टाकले. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 पर्यंत आहे. कोलकाता येथे अत्याचारानंतर डॉक्टरची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसचे सदस्य जवाहर सरकार यांनी राजीनामा दिला. यामुळे बंगालमध्ये ही जागा रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 पर्यंत आहे.

हरयाणा विधानसभेत निवडून आल्यानंतर भाजपाच्या कृष्णलाल पनवार यांची जागा रिक्त आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकींचा फायदा तेदेपाला आंध्रप्रदेशात आणि भाजपाला ओडिशात होणार आहे. बंगालमधून तृणमूलचा सदस्य निवडून येण्याची दाट शक्यता असून भाजपा हरयाणाची जागा कायम ठेवेल, असा अंदाज आहे. (eci releases notification for the 6 vacant seats of rajya sabha by polls will be held on 20th December)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -