घरअर्थजगतEconomic Survey: इलेक्ट्रिक वाहनांची पसंती वाढतेय, वर्षभरात कोट्यवधी EV विक्रीचा अंदाज

Economic Survey: इलेक्ट्रिक वाहनांची पसंती वाढतेय, वर्षभरात कोट्यवधी EV विक्रीचा अंदाज

Subscribe

Sales of Electrical Vehicle | डिसेंबर 2022 मध्ये जपान आणि जर्मनीला मागे टाकून विक्रीच्या बाबतीत भारत तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मार्केट बनण्याची शक्यता आहे.

Sales of Electrical Vehicle | नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) बाजारपेठ वेगाने उदयास येत आहे. 2022 मध्ये सुमारे 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. त्यामुळे येत्या काळात भारतात EV व्यवसाय आणखी विस्तारणार असल्याची शक्यता आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार (Economic Survey), 2023 मध्ये भारतात ईव्हीची विक्री वार्षिक आधारावर 1 कोटीपर्यंत असेल असा अंदाज आहे. मंगळवारी संसदेत सादर केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, डिसेंबर 2022 मध्ये जपान आणि जर्मनीला मागे टाकून विक्रीच्या बाबतीत भारत तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मार्केट (India will become Third Automobile Market) बनण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Budget 2023-24 : इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत ५०७ टक्क्यांची वाढ, पण पायाभूत सुविधांचं काय?

- Advertisement -

आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय इतका मोठा होणार आहे की 2023 पर्यंत 50 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल. देशाचा मूड सध्या हरित ऊर्जेकडे आहे, तो भरून काढण्यासाठी अनेक मोठ्या वाहन उत्पादक कंपन्या आणि अनेक स्टार्टअप कंपन्या या क्षेत्रात पुढे येत आहेत.

भारतात ईव्हीची क्रेझ किती वाढणार?

- Advertisement -

गेल्या वर्षभरात १० लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. आगामी वर्षांत हीच विक्री एक कोटीच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वाढता पेट्रोलचा खर्च थांबवण्याकरता नागरिकांनी आतापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला मोठा प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा – Budget 2023 Expectations: हेल्थकेअर क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून काय आहेत अपेक्षा? जाणून घ्या

कंपन्या फोकस शुद्ध इलेक्ट्रिक

जानेवारीमध्ये आयोजित केलेल्या ऑटो-एक्स्पो मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक दिसून आली. त्यावेळी, अनेक वाहन उत्पादकांनी त्यांच्या आगामी संकल्पना EVचे अनावरण केले. आगामी काळात, बहुतेक ऑटो प्लेयर्स शुद्ध इलेक्ट्रिक होण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहेत. ईव्हीच्या किमती कमी झाल्यास विक्री झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त आहे, कारण बॅटरीची किंमत वाहनाच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के आहे. आगामी काळात बॅटरीच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. किंमत कमी झाल्यानंतर लोकांची आवड ईव्हीवर अधिक असू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडू वर्तवण्यात येतोय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -