घरदेश-विदेश'पाकिस्तान झिंदाबाद' नव्हे तर 'पाकिस्तानसे जिंदा भाग' म्हणत देश सोडून जाणाऱ्यांची संख्या...

‘पाकिस्तान झिंदाबाद’ नव्हे तर ‘पाकिस्तानसे जिंदा भाग’ म्हणत देश सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढली

Subscribe

गव्हाच्या एका पोत्यासाठी लोक मरायला तयार आहेत, अशा पद्धतीने इथे गव्हाच्या पिठासाठी युद्ध सुरू आहे.

पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीही पाकिस्तानच्या तिजोरीत पैसा उरलेला नाही. अशा स्थितीत पाकिस्तानसमोर डिफॉल्टचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागतेय. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी देशाची दुर्दशा आणि विनाशाच्या मार्गावर चाललेल्या सरकारी तपास यंत्रणांवर टीका केली. लाहोरमध्ये दोन विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना पीएम शहबाज यांनी दावा केला की, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) च्या दुटप्पी मानकांमुळे पाकिस्तानला विनाशाकडे ढकलले आहे.

पाकिस्तान आज त्याच्या दयनीय परिस्थितीमुळे जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील महागाई २५ टक्क्यांच्या शिखरावर पोहोचली असून लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गव्हाचा साठा संपल्यानं इथल्या लोकांच्या ताटातून चपातीही गायब झाली आहे. गव्हाच्या एका पोत्यासाठी लोक मरायला तयार आहेत, अशा पद्धतीने इथे गव्हाच्या पिठासाठी युद्ध सुरू आहे.

- Advertisement -

ज्या स्थितीकडे देशाची वाटचाल सुरू आहे, ती पाहता पाकिस्तानचं भविष्य अंधारात जाताना दिसत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता इथले नागरिक पाकिस्तान देश सोडून जाताना दिसत आहेत. हा देश सोडणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणायची वेळ गेली, असं पाकिस्तानचे पत्रकार म्हणताना दिसत आहेत. ‘पाकिस्तान से जिंदा भाग’ असं म्हणायची वेळ आली आहे, असं इथले पत्रकारही म्हणताना दिसत आहेत.

पाकिस्तानमध्ये २०२२ वर्षात ८३२,३३९ लोकांनी देश सोडला. २०१६ नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. २०२२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये देश सोडून जाणाऱ्या पाकिस्तानींच्या संख्येत जवळपास २००% वाढ झाली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचा रेटिंग पॉइंट इतक्या वेगाने घसरलेली पाहता पाकिस्तान कधीही स्वतःला दिवाळखोर घोषित करू शकतो आणि असं झाल्यास ज्यांना पाकिस्तानला कर्ज दिले आहेत त्यांना सर्वात मोठा धक्का बसेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -