नवी दिल्ली : हीरो मोटोकॉर्प लिमिटेडचे सीएमडी आणि अध्यक्ष पवन कांत मुंजाल यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईत जवळपास 24.94 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत करण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईमुळे हीरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहयला मिळाली. यानुसार शेअरमध्ये 1.50 टक्क्याने घसरून 3109.85 रुपयांवर आली आहे.
पवन कांत मुंजाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार 54 कोटी रुपयांचे बेकादेशीररित्या परकीय चलन भारता बाहेर नेहण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच पवन कांत मुंजाल यांनी इतर व्यक्तींच्या नावाने विदेशी चलन जारी केले. यानंतर परकीय चलनाचा परदेशात वैयक्तिक खर्चासाठी वापरले”, असे ईडीने केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे.
हेही वाचा – Diwali 2023 : गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे दिवाळे; खासगी बसपेक्षा विमान प्रवास स्वस्त
ईडीने प्रसिद्धीपत्रक नेमके काय म्हटले
पवन कांत मुंजाल यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर ईडीने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार पवन कांत मुंजाल यांच्याविरूद्ध परकीय चलन बाहेर देशाबाहेर नेहल्याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 135 अंतर्गत दाखल केलेल्या एफआयआरनुसार ईडी तपास करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा – शिवप्रताप दिन! मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये चैतन्य भरवणारा दिवस; उदयनराजेंचं ट्वीट
देशाबाहेर असा पाठवला पैसा
पवन कांत मुंजाल यांनी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीद्वारे अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचाऱ्यांच्या नावावर विदेशी चलन काढून घेतले. यानंतर पवन कांत मुंजाल यांच्या मॅनेजरने त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक सहलीमधील वैयक्तिक खर्चासाठी परकीय चलना पाठवला. तसेच लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत प्रति व्यक्ती 2.5 लाख डॉलर्स प्रति वर्षची मर्यादा काढण्यासाठी अवलंबण्यात आला.
हेही वाचा – शरद पवारांचं एक पत्र आणि 52 जातींचा ओबीसीत समावेश; बच्चू कडूंनी थेट सांगितलं, खरे ओबीसी नेते…
ईडीकडून ‘या’पूर्वी पीके मुंजाल यांच्यावर कारवाई
यापूर्वी ईडीने 1 ऑगस्ट 2023 रोजी पवन कांत मुंजाल, संस्था आणि त्यांच्या संबंधित व्यक्तींवर छापे टाकले होते. यात डिजिटल पुराव्यांसह 25 कोटी रुपये आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या छाप्यात एकूण 50 कोटी रुपये मालमत्ता जप्त केल्याचा अंदाज वर्तविला होता. या प्रकरणाची ईडी अद्यापही चौकशी सुरू आहे.