दीपक कोचर यांना अटक; व्हिडीओकॉन ICICI प्रकरणी ईडीची कारवाई

आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने अटक केली आहे.

ed arrests deepak kochhar husband of former icici bank md ceo chanda kochhar in connection with icici bank videocon case
दीपक कोचर यांना अटक; व्हिडीओकॉन ICICI प्रकरणी ईडीची कारवाई

आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने अटक केली आहे. आयसीआयसीआय बँक व्हिडीओकॉन प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.


हेही वाचा – पोलिसांसाठी हक्काचे १०० खाटांचे कोविड सेंटर उभारणार : पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय