घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये १२५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

छत्तीसगडमध्ये १२५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

Subscribe

गेल्या महिन्यापासून ईडीच्या छत्तीसगडमध्ये कारवाया सुरु आहेत. त्याअंतर्गतच शनिवारी ईडीने कारवाई केली. ईडीची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत स्थावर व जंगम मालमत्तेवर ईडीने जप्ती आणली आहे. जप्ती आणलेल्या सौम्या चौरसिया यांच्या २१ मालमत्तांची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात ईडीने सौम्या चौरसिया यांना अटक केली.

नवी दिल्ली: छत्तीसगड येथे शनिवारी सुमारे १५२ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली. कोळसा वाहतूक व मनी लाॅंड्रींग प्रकरणातील आरोपींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली. यामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उप सचिव सौम्या चौरसिया यांच्या २१ संपत्तींवर ईडीने जप्ती आणली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यापासून ईडीच्या छत्तीसगडमध्ये कारवाया सुरु आहेत. त्याअंतर्गतच शनिवारी ईडीने कारवाई केली. ईडीची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत स्थावर व जंगम मालमत्तेवर ईडीने जप्ती आणली आहे. जप्ती आणलेल्या सौम्या चौरसिया यांच्या २१ मालमत्तांची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात ईडीने सौम्या चौरसिया यांना अटक केली.

- Advertisement -

याप्रकरणी ईडीने ७५ ठिकाणी तपास केला. या तपासात काही महत्त्वाचे पुरावे व कागदपत्रे ईडीच्या हाती लागले आहेत. त्याआधारावर ईडी पुढील तपास करत आहे. पुढील आठवड्यात ईडीकडून मोठी कारवाई केली जाईल, असेही संकेत देण्यात आले आहेत.

सौम्या चौरसिया यांच्या घरावर फेब्रुवारी २०२० मध्ये छापा टाकण्यात आला होता. मोदी सरकारने राजकीय द्वेषापोटी हा छापा टाकला. आमचे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला होता. या छाप्यात आयकर विभागाने चौरसिया यांच्या सहकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकले होते. दोन व्यापाऱ्यांवरही आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यावेळी केंद्र सरकारविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगला होता.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे आयकर विभागाने हे छापे टाकण्यासाठी १९ गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या होत्या. गाड्या नो पार्किंगमध्ये उभ्या असल्याने त्या जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. नंतर त्या गाड्या सोडून देण्यात आल्या.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयकर विभागाने गेल्यावर्षी छापा टाकला होता. आयकर विभागाने सुमारे १०० कोटींचा हवाला घोटाळा उघडकीस आणला होता. हे व्यवहार बँकेतून न होता हवाला मार्फत झाल्याचे आयकर विभागाने उघडकीस आणले होते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -