Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश गोव्यातील खाण व्यावसायिक अनिल साळगावकर यांच्या कंपन्यांवर EDची मोठी कारवाई, वाचा...

गोव्यातील खाण व्यावसायिक अनिल साळगावकर यांच्या कंपन्यांवर EDची मोठी कारवाई, वाचा…

Subscribe

गोव्यातील सर्वात मोठे खाण व्यापारी असलेले दिवंगत अनिल साळगावकर यांच्या विविध कंपन्यांवर EDकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

गोवा : गोव्यातील सर्वात मोठे खाण व्यापारी असलेले दिवंगत अनिल साळगावकर यांच्या विविध कंपन्यांवर EDकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. साळगावकर कुटुंबीयांकडे तब्बल 5 हजार 718 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती असल्याचा आरोप ईडी करून करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोटींच्या घरात असलेली ही संपत्ती अघोषित विदेशी संपत्ती असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. (Big action by ED against Goa mining businessman Salgaonkar’s companies)

हेही वाचा – Good News : बेस्टच्या ताफ्यात आणखी 13 AC इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या दाखल

- Advertisement -

याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून एक निवेदन जारी करण्यात आलेले आहे. या निवेदनानुसार परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा)च्या कलम 37A(1) अंतर्गत हे जप्तीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार दिवंगत अनिल साळगावकर यांची मालमत्ता हस्तांरित करण्यात आलेल्या सर्व 33 कंपन्यांमधील शेअरहोल्डिंग ही ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व कंपन्यांमधील शेअरहोल्डिंग ही 0.1 पासून ते 99.99टक्क्यापर्यंत असल्याची माहिती समोर आलेली आहे. पनामा पेपर्स आणि पनामा लीक पेपर्सची दखल घेत ईडीकडून साळगावकर यांच्या विरोधात हा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

2016 मध्ये निधन झालेले खाण व्यापारी अनिल साळगावकर यांच्यावर याआधी देखील अनेक आरोप लावण्यात आलेले आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे अनिल वासुदेव साळगावकर यांच्यावर अनेक BVI अर्थात ब्रिटिश व्हर्जिन आयलंड कंपन्या स्थापन केल्याचा देखील आरोप आहे. साळगावकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या पाच बीव्हीआय कंपन्यांच्यामार्फत लोहखनिजाचा व्यवसाय करून त्यातून सुमारे 690, 650, 641 अर्थातच 5 हजार 718 कोटी रुपयांचा नफा कमवण्याचा आरोप आहे. पण इतकी मालमत्ता कमावून देखील याबाबत साळगावकरांकडून कोणतीही माहिती शासनाला देण्यात आलेली नाही. ज्यामुळे आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून म्हणजेच 2021 पासून साळगावकर कुटुंबातील लक्ष्मी साळगावकर आणि त्यांच्या चार मुलांना ईडीकडून पाच वेळा नोटीस बजावण्यात आलेली आहे. परंतु त्यांच्याकडून यावर कोणतेही उत्तर न देण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून चौकशीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आता विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्यानुसार साळगावकर कुटुंबीयातील संशयास्पद विदेशातील व्यवहारांची देखील चौकशी करण्यात येत आहे. यासाठी साळगावकर कुटुंबातील लक्ष्मी साळगावकर आणि त्यांची चार मुले समीर ,चंदना, पौर्णिमा आणि अर्जुन यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisment -