घरताज्या घडामोडीपीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सी आणि पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी मेहुल चोक्सी आणि पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

Subscribe

मनी लाँड्रिंग प्रकरण...

पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी (PNB Money Laundering Case) आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी आणि त्यांच्या पत्नीविरोधात ईडीने (Enforcement Directorate) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांची पत्नी प्रीती चोक्सी आणि इतर आरोपींचा देखील समावेश करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील मुख्य लाभार्थी मेहुल चोक्सी यांची पत्नी प्रीती चोक्सी असल्याचे ईडीने म्हटले आहे.

आरोपी प्रीती चोक्सी (Priti Choksi) वर्ष २०१७ पासून अँटिग्वामध्ये पतीसोबत लपून बसली असल्याचेही ईडीने म्हटले आहे. तसेच मेहुल चोक्सी आणि त्यांच्या कंपन्यांसह सहा जणांविरुद्ध मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेलं हे दुसरे पुरवणी आरोपपत्र आहे.

- Advertisement -

१३ हजार ५०० कोटी रूपयांच्या बँकेतील घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीला (CBI and ED) चकवा देऊन चोक्सी भारतातून फरार झाला होता. मात्र, त्यानंतर चोक्सीला मागील वर्षातील २६ मे रोजी डॉमिनिकात अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्या वकिलांनी दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पसच्या सुनावणीनंतर डोमिनिकन कोर्टाने त्याच्या हद्दपारीवर प्रतिबंध केला होता.

- Advertisement -

तब्बल १२१७ कोटींची मालमत्ता जप्त

मेहुल चोक्सी यांच्या संपत्तीवर ईडीने याआधीच टाच आणली आहे. तब्बल १२१७ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मुंबईतील जवळपास ४१ मालमत्ता ईडीकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तर मालमत्तांमध्ये १५ आलिशान फ्लॅट आणि १७ कार्यालयांचा समावेश आहे.


हेही वाचा : Mehul Choksi : मेहुल चोक्सीच्या अडचणीत भर; सीबीआयकडून नवीन गुन्हा दाखल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -