घरदेश-विदेशदिल्ली, मुंबई, चेन्नईमध्ये ईडीचे छापे; कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

दिल्ली, मुंबई, चेन्नईमध्ये ईडीचे छापे; कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

Subscribe

सिक्योरक्लाउड टेक लिमिटेड, प्रो फिन कैपिटल सर्विसेज लिमिटेड, क्वाॅंटम ग्लोबल सिक्योरिटीज लिमिटेड, यूनिटी ग्लोबल फायनानशिअल सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, डेजर्ट रिवर कैपिटल प्राइवेट लिमिटेड व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. छाप्यांमध्ये १.४ कोटींची रोकड, सोने, हिरे व दागिने जप्त करण्यात आले.

नवी दिल्ली: मनी लाँड्रींग प्रकरणी सक्तवसुली (ईडी) संचलनालयाने शुक्रवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई येथील १६ ठिकाणी छापे टाकले. छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

सिक्योरक्लाउड टेक लिमिटेड, प्रो फिन कैपिटल सर्विसेज लिमिटेड, क्वाॅंटम ग्लोबल सिक्योरिटीज लिमिटेड, यूनिटी ग्लोबल फायनानशिअल सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, डेजर्ट रिवर कैपिटल प्राइवेट लिमिटेड व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. छाप्यांमध्ये १.४ कोटींची रोकड, सोने, हिरे व दागिने जप्त करण्यात आले. काही मालमत्तांचाही खुलासा छाप्यांमध्ये झाला आहे. यावेळी ईडीने विविध डिमॅट खाते, काही कागदपत्रे व डिजिटल कागदपत्रे जप्त केली.

- Advertisement -

मनी लाँड्रींग कायद्यातंर्गत तपास करताना ईडीने शेअर दलालांची चौकशी केली. या चौकशीत धकादायक माहिती समोर आली आहे. शेअर व वित्तसेवा कंपन्यांच्या मालकांनी १६० कोटी रुपयांचे शेअर दिशाभूल करुन विकले. याद्वारे त्यांना कोट्यवधी रुपयांचा नफा झाला, असा आरोप आहे.

ईडीचे देशभरात छापेमारी सुरुच असते. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही छापेमारी सुरुच असते. गुरुवारी ईडीने नागपूर येथील सुपारी व्यापाऱ्याकडे छापा टाकला. प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, हेमंत कुमार गुलाबचंद, वसीम बावला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवर छापे टाकल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. यामुळे एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

१८ घरे व अन्य ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सुमारे १३० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. छाप्यात सुपारी व्यवहाराची बेहिशोबी कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. छापेमारी केलेले सर्व व्यापारी विदेशी सुपारी आयात करणारे आहेत. यापूर्वीही ते वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर होते.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडही ईडीच्या रडारावर आले आहेत. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. नुकताच त्याचा लायगर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी केलेली गुंतवणूक आणि त्याच्या टीमला दिलेल्या पैशांबाबत अभिनेता विजय देवरकोंडाची तब्बल दोन तास ई़डी कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्याआधी चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाध आणि अभिनेत्री-निर्माती चार्मी कौर यांचीही चौकशी ईडीने केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -