घरदेश-विदेशED Raid On CM Hemant Soren : ईडीच्या छाप्यानंतर हेमंत सोरेन नॉट...

ED Raid On CM Hemant Soren : ईडीच्या छाप्यानंतर हेमंत सोरेन नॉट रिचेबल; महागडी गाडी केली जप्त

Subscribe

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा सर्वत्र शोध सुरू केला आहे. यापूर्वी ईडीच्या टीमने त्यांच्या दिल्लीतील घरासह तीन ठिकाणी छापे टाकले होते. दहावे समन्स जारी केल्यानंतर आज ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे.

रांची : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम देशभरात वाजायला सुरुवात झाली आहे. असे असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांवर तपास यंत्रणांचा फास घट्ट होताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याभोवती ईडीचा घट्ट होत असतानाच दुसरीकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. ईडीच्या छापेमारीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन नॉट रिचेबल झाल्याची माहिती पुढे येत आहे. (ED Raid On CM Hemant Soren Hemant Soren Not Reachable After ED Raid Expensive car confiscated)

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा सर्वत्र शोध सुरू केला आहे. यापूर्वी ईडीच्या टीमने त्यांच्या दिल्लीतील घरासह तीन ठिकाणी छापे टाकले होते. दहावे समन्स जारी केल्यानंतर आज ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे.

- Advertisement -

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत. सोमवारी (29 जानेवारी) ईडीच्या पथकाने सकाळी 7 वाजल्यापासून दिल्लीतील शांती निकेतनमधील सोरेन यांच्या घरासह 3 ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली, जी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ईडीच्या टीमला तेथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सापडले नाही. पण निघताना टीमने त्यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली. ईडीने जप्त केलेली कार एचआर म्हणजेच हरियाणा राज्याची पासींग असलेली आहे.

- Advertisement -

कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली

खबरदारी घेत ईडीच्या टीमने हेमंत सोरेनबाबत विमानतळावर अलर्टही जारी केला आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या बॅगा आणि सामानासह रांचीमध्ये एका ठिकाणी जमण्यास सांगण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार आणि मंत्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे. दुबे यांनी म्हणाले की, हेमंत सोरेन यांनी जेएमएम आणि काँग्रेस तसेच सहयोगी आमदारांना सामान आणि बॅगांसह रांचीला बोलावले आहे. कारण कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आला आहे. ईडीच्या चौकशीच्या भीतीमुळे ते रांचीला पोहोचणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

हेही वाचा : Rajya Sabha Elections : भाजपाची रणनीती ठरली; ‘मविआ’साठी तारेवरची कसरत

दोन दिवसांपूर्वी सोरेन दिल्लीला रवाना

मुख्यमंत्री हेमंत सोरेन 27 जानेवारी रोजी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी चार्टर फ्लाइटने उड्डाण केले होते. त्यानंतर काही राजकीय बैठका घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. तेथे ते कायदेशीर सल्लाही घेणार होते. यापूर्वी, ईडीने त्यांना दहावे समन्स पाठवले होते. 29 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते. जर ते ईडीसमोर हजर झाले नाही तर ईडीकडून त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली होती.

हेही वाचा : Solapur Crime : बापानेच मुलाला संपवलं! अभ्यास करत नसल्याने उचललं पाऊल

यापूर्वी 20 जानेवारी रोजी जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक रांचीला पोहोचले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, सोरेन यांनी केंद्रीय एजन्सीला पत्र लिहिले होते की, ते त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवणार असल्याचे ते म्हणाले होते. ईडीने 13 जानेवारी रोजी सोरेन यांना आठवे समन्स पाठवून 16 ते 20 जानेवारी दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -