घरताज्या घडामोडीचीनी कंपन्या भारतात करत होत्या सट्टेबाजी, ईडीने ४६.९६ कोटी केले जप्त!

चीनी कंपन्या भारतात करत होत्या सट्टेबाजी, ईडीने ४६.९६ कोटी केले जप्त!

Subscribe

भारतात कार्यरत असलेल्या चीनी कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकत एचएसबीसी बँकेची चार खाती गोठविली आहेत. या खात्यात ४६.९६ कोटी जमा आहेत. या चीनी कंपन्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई करण्यापूर्वी या कंपन्यांवर छापा टाकला होता. या कंपन्या ऑनलाईन जुगारच्या खेळ चालवत होत्या. ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई आणि पुणे येथे १५ ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय तपास यंत्रणेने नोंदणीकृत कार्यालये, संचालक, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटेंट) याच्या कार्यालयांवरही छापा टाकला. भारताबाहेरून हे जुगार अर्ज चालवले जात होते.

- Advertisement -

या कारवाईत ईडीने १७ हार्ड डिस्क, ५ लॅपटॉप, फोन, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. तसेच चार बँक खात्यांमधील ४६.९६ कोटी रुपये देखील जप्त केले. आता हैदराबाद पोलिसांच्या तक्रारीवरून ईडीने चीनी कंपनी डोकाइप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आणि लिंकन टेक्नॉलॉजी प्रायव्हेटे लिमिटेडविरूद्ध मनी लॉड्रिंगचा तपास सुरू केला आहे. ईडीने डोकाइप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन बँक खात्यांचा तपास केला असता असे आढळून आले की, मागील वर्षी या खात्यात १,२६८ कोटी रुपये जमा झाले होते. त्यापैकी ३०० कोटी रुपये पेटीएम पेमेंट गेटवेद्वारे आले आणि ६०० कोटी रुपये पेटीएम गेटवेद्वारे बाहेर गेले. या खात्यांमधून १२० कोटी रुपयांचे अवैध पेमेंट झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

ईडीने असे म्हटले आहे की, ‘आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळले आहेत. ज्याला कोणताही आधार नाही आहे. हा आर्थिक व्यवहार भारतीय कंपनीसोबत झाला आहे. या कंपनी ऑनलाईन चायनीज डेटिंग App चालवतात. या कंपन्यांचा हवाला व्यवसायातही सहभाग असल्याचा ईडीचा संशय आहे. आता ईडी ऑनलाईन व्हॅलेट कंपन्या आणि एचएसबीसी कडून याची माहिती गोळा करीत आहे.’

- Advertisement -

तपासादरम्यान काही भारतीय चार्टर्ड अकाऊटंट्सच्या मदतीने चीनी नागरिकांनी अनेक भारतीय कंपन्यांची स्थापना केल्याचे समोर आले. या कंपन्यांमध्ये पहिले डमी भारतीय संचालक ठेवण्यात आले होते आणि त्यांची नोंदणी झाली. काही दिवसांनंतर हे चीनी नागरिक भारतात आले आणि त्यांनी या कंपन्यांचे संचालक पद आपल्या हातात घेतले.


हेही वाचा – काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर – संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -