घरक्राइमइंडोनेशियन सुपारी तस्करी प्रकरणी ईडीची राज्यात 17 ठिकाणी छापेमारी 16 लाखांची रोकड...

इंडोनेशियन सुपारी तस्करी प्रकरणी ईडीची राज्यात 17 ठिकाणी छापेमारी 16 लाखांची रोकड जप्त

Subscribe

इंडोनेशियन अरेका सुपारी तस्करी प्रकरणी आज ईडीने मुंबई, नागपूरसह राज्यातील 17 ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने PMLA 2002 कायद्याअंतर्गत ही छापेमारी केली आहे. या छापेमारीत या प्रकरणीशी संबंधित विविध व्यक्तींची कार्यालये, निवासी परिसरांचा समावेश आहे. दरम्यान ही सुपारी तस्करी भारत- म्यानमार सीमेवरून केली जात होती.

ईडीच्या तपासात इंडोनेशियन सुपारी पुरवठादार, कमिशन एजंट, लॉजिस्टिक प्रदाते, वाहतूकदार, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांचे एक सुसंघटित रे उघड झाले आहे, जे इंडो-म्यानमार सीमेवरून भारतात इंडोनेशियन सुपारीची तस्करी करण्यात गुंतलेले होते.

- Advertisement -

ईडीच्या छापेमारीदरम्यान, नागपूरमध्ये पीएमएलए अंतर्गत सुमारे 11.5 कोटी रुपयांची 289.57 मेट्रिक टन सुपारीची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. तसेच ईडीने 16.5 लाख रुपये रोख आणि विविध गुन्हे करणारी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत.


वादग्रस्त शाहिद बलवा, विनोद गोयंका होते ठाकरे सरकारच्या कमिटीवर, आशरांना होतोय विरोध

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -