माफिया मुख्तार अन्सारीवर ईडीची मोठी कारवाई; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली, यूपीत छापेमारी

ed raids in up delhi in money laundering case against mukhtar ansari

अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी माफियातून राजकारणी झालेल्या मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. अन्सारी यांच्यासंबंधीत उत्तर प्रदेशातील गाझीपूर, लखनौ आणि दिल्ली याठिकाणच्या मालमत्तेवर ईडीने ही छापेमारी केली आहे. तसेच अन्सारी यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित मालमत्तेचीही ईडीने झडती घेतली आहे.

भाऊ अफजल अन्सारीच्या अड्ड्यांवरही छापेमारी

ईडीने गाझीपूरमध्ये टाकलेल्या छाप्यात मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारीच्या जवळच्या लोकांच्या मालमत्तेची झडती घेतली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकचं खळबळ उडाली आहे. मुख्तारच्या जवळच्या मित्रांवर टाकलेल्या छाप्यादरम्यान सुरक्षेसाठी निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी पोलिसांचा मोठा फौजाफाटा घटनास्थळी दाखल आहेत.

पीएमएलए गुन्हेगारी कलमाखाली अन्सारींविरुद्ध सुरु असलेल्या तपासासंदर्भात पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात आहे. पाच वेळा माजी आमदार राहिलेले अन्सारी सध्या उत्तर प्रदेशातील बांदा तुरुंगात आहेत.

मुख्तार यांच्यावर जमीन गैरव्यवहार, खून, खंडणीसह किमान 49 गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात ईडी तपास करत आहे. उत्तर प्रदेशात खुनाचा प्रयत्न आणि खुन यासह अनेक प्रकरणांवर खटला सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गाझीपूर जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात अन्सारींच्या कथित बेकायदेशीर कमाईचा वापर करत खरेदी केलेले 1.901 हेक्टर आणि 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दोन भूखंड जप्त केले आहेत.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा; प्रियंका चतुर्वेदींचे पंतप्रधान मोदींना पत्र