जनावरांच्या तस्करीत दीड कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

आरोपी सहगल हुसैन हा तृणमुलचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांचा बाॅडी गार्ड होता. याप्रकरणी सहगलची पत्नी व आईच्या संपत्तीचा शोध ईडीने घेतला. यासंदर्भात त्यांची चौकशीही करण्यात आली. त्यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले होते. 

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल जनावरे तस्करी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुमारे दिड कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता आरोपी सहगल हुसैन व त्याच्या कुटुंबियांची आहे.

आरोपी सहगल हुसैन हा तृणमुलचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांचा बाॅडी गार्ड होता. याप्रकरणी सहगलची पत्नी व आईच्या संपत्तीचा शोध ईडीने घेतला. यासंदर्भात त्यांची चौकशीही करण्यात आली. त्यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले होते.

गेल्या काही महिन्यात ईडीने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. देशभरात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली आहे. गेल्या आठवड्यात ईडीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उप सचिव सौम्या चौरसिया यांना अटक केली. सौम्या चौरसिया यांच्या घरावर फेब्रुवारी २०२० मध्ये छापा टाकण्यात आला होता. मोदी सरकारने राजकीय द्वेषापोटी हा छापा टाकला. आमचे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला होता. या छाप्यात आयकर विभागाने चौरसिया यांच्या सहकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकले होते. दोन व्यापाऱ्यांवरही आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यावेळी केंद्र सरकारविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगला होता.

तसेच सिक्योरक्लाउड टेक लिमिटेड, प्रो फिन कैपिटल सर्विसेज लिमिटेड, क्वाॅंटम ग्लोबल सिक्योरिटीज लिमिटेड, यूनिटी ग्लोबल फायनानशिअल सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, डेजर्ट रिवर कैपिटल प्राइवेट लिमिटेड व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर  ईडीने छापे टाकले. छाप्यांमध्ये १.४ कोटींची रोकड, सोने, हिरे व दागिने जप्त करण्यात आले. काही मालमत्तांचाही खुलासा छाप्यांमध्ये झाला आहे. यावेळी ईडीने विविध डिमॅट खाते, काही कागदपत्रे व डिजिटल कागदपत्रे जप्त केली. या छाप्यांमुळे एकच खळबळ उडाली.

ईडीने नागपूर येथील सुपारी व्यापाऱ्याकडे छापा टाकला. प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, हेमंत कुमार गुलाबचंद, वसीम बावला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवर छापे टाकल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. यामुळे एकच खळबळ उडाली. १८ घरे व अन्य ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सुमारे १३० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. छाप्यात सुपारी व्यवहाराची बेहिशोबी कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. छापेमारी केलेले सर्व व्यापारी विदेशी सुपारी आयात करणारे आहेत. यापूर्वीही ते वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर होते.