नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीने 5 काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी बजावले समन्स

ed summoned five congress leaders for questioning in the national herald case

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने पाच काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या नेत्यांमध्ये अंजन कुमार, मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी आणि गली अनिल यांचा समावेश आहे. ईडीने या नेत्यांना मंगळवारी ( 4 ऑक्टोबर) दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असताना या नेत्यांनी कंपनीला देणग्या दिल्या होत्या. याच चौकशीसाठी ईडीने या नेत्यांना समन्स बजावला आहे.

याआधीही रविवारी ईडीने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्डमध्ये सुरु असलेल्या मनी लाँड्रिंगच्या चौकशीबाबत बोलत होते. ईडीने 7 ऑक्टोबरला दिल्लीत चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सुरु असून ही यात्रा आता कर्नाटकात दाखल झाली असताना हे समन्स बजावण्यात आले आहे. यात्रेच्या या टप्प्याच्या संचालनात शिवकुमार यांचा सहभाग आहे. 30 सप्टेंबर रोजी ही यात्रा कर्नाटकात दाखल झाली आहे.

यंग इंडियनचे कार्यालय सील 

ईडीने आता नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले आहेत. यंग इंडियन ही कंपनी नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालक आहे. ऑगस्ट महिन्यात यंग इंडियनचे कार्यालय सील करण्याबरोबरच ईडीने डझनभर ठिकाणी छापेमारी केली.

‘या’ नेत्यांचीही होणार चौकशी

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यांत ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे खासदार पुत्र राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पवन बन्सल यांसारख्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची चौकशी केली आहे. या प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची अनेक दिवस चौकशी करण्यात आली. ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले होते.


जेईई मेन परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये रशियन नागरिकाकडून हॅकिंगचा प्रयत्न; सीबीआयने ठोकल्या बेड्या