घरताज्या घडामोडीमरकजचे प्रमुख मौलाना सादवर ईडीने केला गुन्हा दाखल

मरकजचे प्रमुख मौलाना सादवर ईडीने केला गुन्हा दाखल

Subscribe

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी मौलाना साद आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केला होता आणि आता ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तबलीगी जमात आणि मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी मौलाना साद आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केला होता आणि आता ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक अन्वेषण यंत्रणेला असा संशय आहे की मौलाना साद यांच्या संस्थेला परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे आले आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली नाही. ईडीने मौलाना साद यांच्या ८ साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मीडीयाच्या माध्यमातून मला मौलाना साद व इतरांवर ईडीद्वारे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवल्याची बातमी मिळाली, असं मौलाना साद यांचे वकील तौसिफ खान यांनी म्हटलं होतं. पुढे ते म्हणाले मौलाना साद यांचं कुटुंब तपास यंत्रणांना सहकार्य करीत आहेत. ते तपास टाळत आहे आणि सहकार्य करत नाहीत, असं म्हणणं निराधार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शाहीनबाग बनलं कोरोनाचं हॉटस्पॉट; दिल्लीने कोरोनाचे हॉटस्पॉट वाढवले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -