Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीला ईडीचा दणका, ९ हजार कोटींची संपत्ती...

विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीला ईडीचा दणका, ९ हजार कोटींची संपत्ती घेतली ताब्यात

Related Story

- Advertisement -

भारतीय बँकाना चुना लावून परदेशात फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने मोठा दणका दिला आहे. या उद्योगपतींनी भारतातील सार्वजनिक बँकांचं कर्ज बुडवून परदेशात पळून गेले. याप्रकरणी आता ईडीने ईडीने नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोक्सी या तिघांची एकूण ९ हजार ३७१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही संपूर्ण रक्कम ईडीने कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे जमा केली आहे.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीने उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची एकुण १८ हजार १७० कोटींची संपत्ती जप्त केली. त्यांनी फसवणुक केलेल्या रकमेच्या तुलनेने ही रक्कम  ८० टक्के एवढी आहे. ईडीने हस्तांतरण प्रक्रियेबद्दलची माहिती बुधवारी जाहीर केली. ईडीने ट्वीट करून सांगितले की “ईडीने संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या प्रकरणात १८,१७०.०२ कोटी (बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ८०.४५ टक्के रक्कम) रुपयांची संपत्ती जप्त केली असून यापैकी ९३७१.१७ कोटी रुपयांची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे जमा केली आहे,”

- Advertisement -

विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी फसवणूक केल्याने बँकांचे तब्बल २२ हजार ५८५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यातील मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीने काही बँक अधिकाऱ्यांशी हात मिळवणी तर १३ हजार ५०० कोटी रुपयांचे पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेत फसवणूक केली आहे. यानंतर हे दोघेही जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळून गेले, सध्या नीरव मोदी लंडनमधील एका तुरूंगात असून, मेहुल चोक्सी डोमिनिका देशातील तुरूंगात आहे. या दोघांविरुद्ध सध्या सीबीआय चौकशी सुरु असून, त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे ९००० कोटींची घोटाळा आणि बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी विजय मल्ल्याची चौकशी सुरू आहे. यात किंगफिशर एअरलाईन्सचा समावेश आहे. तो सध्या ब्रिटनमध्ये असून त्याला भारतात आणण्यासाठई प्रयत्न सुरु आहेत. या तिघांनी देशातील तब्बल २२ हजार ५८५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे तिघांच्याही भारत प्रत्यार्पणासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरु आहेत.


 

- Advertisement -