घरदेश-विदेशइजिप्तमध्ये भीषण अपघात; २८ ठार, १६ भारतीय जखमी

इजिप्तमध्ये भीषण अपघात; २८ ठार, १६ भारतीय जखमी

Subscribe

इजिप्तमध्ये दोन भीषण अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण २८ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका भारतीय पर्यटकाचा समावेश आहे.

इजिप्तमध्ये दोन भीषण अपघात झाले आहेत. या अपघातमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला असून या मृतांमध्ये एक भारतीय पर्यटकाचा समावेश आहे. तसंच याशिवाय १६ भारतीय पर्यटक जखमी झाल्याची माहिती भारतीय दूतवासाने दिली आहे. या सर्व पर्यटकांवर सूझ शहारातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी ‘इंडियन इन इजिप्त’ या ट्विटर अकाऊंटवरुन या अपघाताची माहिती दिली आली आहे. तसंच त्यांनी सूझ आणि कैरो येथील दोन संपर्क क्रमांक या ट्विटद्वारे जारी केले आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार, पहिल्या अपघातामध्ये टेक्सटाईल कामगारांना घेऊन जाणारी बस एका कारवर आदळली असून यामध्ये सहा जण ठार झाले आहेत. तर दुसऱ्या अपघातात भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या दोन बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्या. या अपघातात २२ जण ठार झाले असून एका भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. तर भारतीय दूतवासाने १६ भारतीयांसह २४ जण जखमी झाल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा – कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -