घरदेश-विदेशकाँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेत्यांसह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश...

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेत्यांसह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

Subscribe

40 जागांच्या गोवा विधानसभेत सध्या भाजपचे 20 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 11 जागा आहेत. याशिवाय महाराष्ट्रवादी गोमंतककडे दोन आणि गोवा फॉरवर्ड पक्षाकडे एक जागा आहे.

पणजीः महाराष्ट्रातील काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर आता गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचवेळी गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दावा केला आहे की, लवकरच काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

- Advertisement -

काँग्रेसकडे आता 11 आमदार

40 जागांच्या गोवा विधानसभेत सध्या भाजपचे 20 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 11 जागा आहेत. याशिवाय महाराष्ट्रवादी गोमंतककडे दोन आणि गोवा फॉरवर्ड पक्षाकडे एक जागा आहे. तर इतरांच्या खात्यात सहा जागा आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये गेल्यास विधानसभेत काँग्रेसला केवळ तीन जागा उरतील. त्याचवेळी भाजपची संख्या 28 वर जाईल.

- Advertisement -

हे आमदार काँग्रेस सोडू शकतात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिगंबर कामत, मायकल लोबो, डी लोबो, राजेश फळदेसाई, केदार नायक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस काँग्रेस सोडू शकतात. बुधवारी या आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली. लवकरच आमदारांकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली जाऊ शकते, असे मानले जात आहे.


हेही वाचाः प्रकल्प महाराष्ट्रातून निसटला कसा?, फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -