पाकिस्तानमध्ये आठ वर्षीय हिंदू मुलाला ईशनिंदा कायद्यांतर्गत अटक, फाशी होण्याची शक्यता

पाकिस्तानच्या इतिहासात पहील्यांदाच एका आठ वर्षीय बालकावर ईशनिंदा कायद्यांतर्गेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या इतिहासात पहील्यांदाच एका आठ वर्षीय बालकावर ईशनिंदा कायद्यांतर्गेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब प्रांतातील हिंदू मंदिरातील तोडफोडीच्या घटनेनंतर या कायद्यांतर्गेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्याला फाशीची शिक्षाही सुनावली जाऊ शकते. विशेष म्हणजे आरोपी मुलगा हिंदू आहे.

येथील एका मदरशामधील लायब्ररीत कार्पेटवर मुस्लीम धर्माशी संबंधित काही पुस्तके ठेवण्यात आली होती. आरोपी मुलाने त्यावर लघुशंका केली असा आरोप तेथील मौलानाने केला. त्यानंतर पोलिसांनी मुलाला अटक केली. सात दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर मुलाला जामिनावर सोडण्यात आले आहे. यामुळे चिडलेल्या शेकडो समाजकंटकांनी एका हिंदू मंदिरावर हल्ला करत तोडफोड केली. त्यानंतर मंदिराला आग लावली.

तर दुसरीकडे मुलाला जाणीवपूर्वक याप्रकरणात गुंतवण्यात येत असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. तसेच त्याला ईशनिंदा कायदा काय हे देखील माहित नाही. यामुळे आपल्याला जेलमध्ये का ठेवण्यात आले असा प्रश्न त्याला पडला असून या घटनेमुळे त्याला व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. तसेच येथे अल्पसंख्यांकांना न्याय मिळणार नाही . यामुळे पुढे काय होईल या विचाराने आमची झोप उडाली असल्याचे मुलाच्या पालकांनी सांगितले आहे.