घर देश-विदेश 'एकतर देव तुम्हाला नेईल, नाहीतर...'; भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची विरोधी पक्षांना कथित धमकी

‘एकतर देव तुम्हाला नेईल, नाहीतर…’; भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची विरोधी पक्षांना कथित धमकी

Subscribe

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि बंगालमधील मेदिनीपूरचे खासदार दिलीप घोष (Dilip Ghosh) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात मोदी सरकारच्या (Modi Government) विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांना कथितपणे धमकी देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील विरोधी पक्षांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. या विरोधात विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात बोलताना दिलीप घोष यांनी शनिवारी (६ मे) बांकुरा येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्या मागे लागलेल्या आणि देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. भाजपाच्या मागे लागण्याचा प्रयत्न केला तर ‘एकतर देव नेईन, नाहीतर सीबीआय,’ असे वक्तव्य करताना त्यांनी विरोधी पक्षाला कथितपणे धमकी दिली आहे. यावेळी त्यांनी कोलकाताच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि मुलायमसिंह यादव यांच्यासारखेच भविष्य ममता बॅनर्जी यांनाही मिळेल. यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसला लुटारूंचा पक्ष असा उल्लेखही केला.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसकडून दिलीप घोष यांच्यावर टीका
तृणमूल काँग्रेसकडून दिलीप घोष यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तृणमूलचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य शंतनू सेन म्हणाले की, भाजपा विरोधकांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे दिलीप घोष यांनी मान्य केले आहे. हा मुद्दा आम्ही बऱ्याच दिवसांपासून मांडत आहोत. त्याचवेळी माकपचे नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले की, दिलीप घोष यांनी कोलकातामधील राजकीय भाषा एका खालच्या पातळीवर नेली आहे.

डॉ. सुभाष सरकार यांच्याकडूनही वाद निर्णाण करण्याचा प्रयत्न
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) दुर्गापूर येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री आणि बांकुरा येथील खासदार डॉ. सुभाष सरकार यांनी ऋषीमुनींबद्दल वक्तव्य करताना वाद निर्माण केला आहे. त्यांनी म्हटले की, भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्याआधापासूनच पदार्थ आणि ऊर्जा यांच्या संयोगाचा पुरावा आपल्या संस्कृतीत आधीपासून आहे आणि ऋषीमुनींना आधीच सांगितले होते, असे ते म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -