घरदेश-विदेशElection 2023: भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्याने केले मुंडन, उडवली मिशी

Election 2023: भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्याने केले मुंडन, उडवली मिशी

Subscribe

छत्तीसगडमधील महासमुंदमधील निवडणुकीदरम्यान काही रंजक गोष्टीही घडल्याचं समोर येत आहे. त्यापैकी एक म्हणजे विचित्र पैज लावणे.

रायपूर: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यात भाजपाने 3 राज्यांमध्ये आपली सत्ता काबीज केली आहे. भाजपाला घसघशीत यश मिळाले आहे.असं असतानाच छत्तीसगडमधील महासमुंदमधील निवडणुकीदरम्यान काही रंजक गोष्टीही घडल्याचं समोर येत आहे. त्यापैकी एक म्हणजे विचित्र पैज लावणे. (Election 2023 After BJP candidate s defeat activist shaves head blows off moustache)

यावेळी विधानसभा निवडणुकीत महासमुंद जिल्ह्यातील खल्लारी विधानसभेत उमेदवारांच्या विजय-पराजयाची स्थिती निर्माण झाली होती. त्यात भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने सट्टा लावणाऱ्या कार्यकर्त्याने हरल्यानंतर दिलेले वचन पाळले आहे सध्या तो लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. या कार्यकर्त्याने म्हटल्याप्रमाणे आपलं अर्ध मुंडन केलं आहे. तसचं, अर्ध्या मिशा उडवल्या आहेत.

- Advertisement -

डेरा राम यादव, असं या कार्यकर्त्याचं नावं आहे. तो 48 वर्षांचा आहे. खल्लारी विधानसभेच्या बिहाझर गावात राहतो आणि तो इलेक्ट्रिशियन आहे. खल्लारी विधानसभेतील भाजपच्या उमेदवार अलका चंद्राकर यांच्या विजयाचा दावा करत त्याने आपल्या मित्रांसोबत पैज लावली होती की, जर अलका चंद्राकर निवडणुकीत पराभूत झाल्या तर त्याचे अर्धे केस आणि अर्धी मुशी उडवेल.

यानंतर, निवडणूक निकालात अलका चंद्राकर यांचा पराभव झाल्यानंतर, डेरा राम यांनी आपले वचन पूर्ण केले आणि ते चर्चेचे केंद्र बनले आहेत. डेरा राम यादवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसप्रमाणे आश्वासने मोडणाऱ्यांमध्ये आम्ही नाही, असं म्हणत डेरा राम यांनी काँग्रेसला टोला लगावला. आम्ही दिलेले वचन पाळणारे आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, असे डेरा राम म्हणाले.

- Advertisement -

भाजपचा दणदणीत विजय

छत्तीसगडमध्ये विधासभेच्या 90 जागांसाठी निवडणूक पार पडली. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत भाजपाने 54 जागा जिंकून सत्ता मिळवली. तर काँग्रेसला केवळ 35 जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय 1 जागा इतरांच्या खात्यात गेली.

(हेही वाचा: Parliament : Article 370 हटवल्यानंतर काय केले? अमित शहांनी आकडेच वाचून दाखवले )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -