घरICC WC 2023'माझी आणि माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नका', सचिन पायलटांचा पंतप्रधान मोदींवर...

‘माझी आणि माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नका’, सचिन पायलटांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Subscribe

माझ्या आणि माझ्या राजकीय भवितव्याची कोणीही चिंता करू नये. माझा पक्ष आणि लोक याची काळजी करतील आणि माझी चांगली काळजी घेतील.

भीलवाडा: काँग्रेसचे राजस्थानमधील नेते सचिन पायलट यांनी पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका करत पक्ष आणि लोकांशिवाय इतर कोणालाही त्यांची चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. पायलट म्हणाले की त्यांचे वडील हे आयुष्यभर एक निष्ठावान काँग्रेस नेते होते. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेली विधाने ही वस्तुस्थितीच्या पलीकडील आहेत. त्यांना सर्व सामान्यांचे लक्ष भरकटवायचे आहे. (Election 2023 Don t worry about me and my political future Sachin Pilot hits back at PM Narendra Modi)

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की, राजेश पायलट यांनी एकेकाळी काँग्रेस पक्षाच्या भल्यासाठी गांधी परिवाराला आव्हान दिलं होतं. परंतु हे कुटुंबच असं आहे की राजेशजींना शिक्षा दिल्यानंतर ते आता त्यांच्या मुलालाही (सचिन पायलट) शिक्षा देत आहेत.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये जो कोणी सत्य बोलतो त्याला राजकारणातून बाहेर फेकले जाते असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. 1997 मध्ये पक्षाध्यक्षपदासाठी राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची सूचना केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाची मर्जी गमावली.

पीएम मोदींच्या दाव्याला उत्तर देताना सचिन पायलट यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “माझ्या दिवंगत वडिलांनी 1998 मध्ये शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षपदासाठी सीताराम केसरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी सोनिया गांधी सक्रिय राजकारणात नव्हत्या. केसरी जिंकले. निवडून आले आणि नंतर पवार आणि माझ्या वडिलांना कार्यकारिणीत उमेदवारी दिली.

- Advertisement -

ते म्हणाले, निरोगी लोकशाही संघटना आणि राजकीय पक्षाने असे काम केले पाहिजे. मला अगदी लहान वयात खासदार होण्याची संधी मिळाली आणि मी अनेक वर्षे केंद्र सरकार आणि राज्य पातळीवर अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. माझ्या आणि माझ्या राजकीय भवितव्याची कोणीही चिंता करू नये. माझा पक्ष आणि लोक याची काळजी करतील आणि माझी चांगली काळजी घेतील.

पायलट म्हणाले की, त्यांचे वडील इंदिरा गांधींच्या प्रेरणेने काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आणि आयुष्यभर जातीयवादी शक्तींशी लढा दिला. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी आपले संबंध अनेक दशकांपासून आहेत. हे नाते हृदयाचे आहे, हे नाते जुने आहे.

(हेही वाचा: Rajasthan election : अमित शहांच्या मुलाची योग्यता काय? काँग्रेसचा पलटवार)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -