घरElection 2023Election 2023 : सट्टेबाजांनी जाहीर केला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालाचा अंदाज

Election 2023 : सट्टेबाजांनी जाहीर केला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालाचा अंदाज

Subscribe

नवी दिल्ली : मिझोराम, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून आता 3 डिसेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, हा निकाल जाहीर होण्यापूर्वीच बुकींनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कोणाची सत्ता येणार असल्याचा अनुमान जाहीर केला आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणीपूर्वी सट्टेबाजांनी सट्टेबाजीच्या दरांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा – भारताच्या पराभवासाठी लहान भावासह वडिलांना धरले जबाबदार; मटण खाण्याचा वाद विकोपाला गेला अन्…

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी ही निवडणूक होत असल्याने याला विशेष महत्त्व आले आहे. यासंदर्भात सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर असेल, असा अनुमान आहे. तर, राजस्थानमध्ये भाजपाची सरशी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता सट्टेबाजांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. बुकींच्या राजकीय गणितानुसार या राज्यांमध्ये काँग्रेस जादूई आकड्याला सहज स्पर्श करेल. सट्टेबाजांच्या मते, मध्य प्रदेशातील 116च्या जादुई आकड्यापैकी काँग्रेस पक्षाला 116 ते 119 जागा मिळतील. त्याचबरोबर छत्तीसगड निवडणुकीतही काँग्रेसला 50 ते 52 जागा मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरकार स्थापन होताच छत्तीसगड गृह लक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात थेट 15,000 रुपये दिले जातील, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आश्वासन दिले आहे. तर, विवाहित महिलांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्‍वाही भाजपाने आपल्‍या निवडणूक जाहीरनाम्यात दिली आहे. देशातील निवडणुकीत राजकीय विश्लेषक आणि जनतेचे मत महत्त्वाचे असले तरी, सट्टेबाजांचे आणि त्यांच्या सट्टेबाजांची गणिते वेगळीच असतात, जी निवडणुकीतील राजकीय पक्षांचा विजय-पराजयांचा अंदाज वर्तवितात.

- Advertisement -

हेही वाचा – ‘BOSS असावा तर असा’; विश्वचषकातील भारताच्या पराभवातून सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी

मध्य प्रदेश-छत्तीसगडमधील सट्टेबाजीचे दर

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मतदान झाले असून आता 3 डिसेंबरला निकाल लागणार आहेत. अशा स्थितीत सट्टाबाजार तापला असून, भावही ठरले आहेत. हे दर मुंबई आणि इंदूर येथील सट्टेबाजी केंद्रांवरून जारी करण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशातील निकालापूर्वी सट्ट्याचा दर
काँग्रेस : ​​116-119 जागा (भाव – 75 पैसे)
भाजपा : 106-109 जागा (भाव – 1.25 रुपया)

छत्तीसगडमध्ये सट्ट्याचे दर –
काँग्रेस : ​​50- 52 जागा (भाव – 85 पैसे)
भाजपा: 37 – 39 जागा (भाव – 1.15 पैसे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -