घरदेश-विदेशहाय कोर्टानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग; विजयी मिरवणुकांवर बंदी

हाय कोर्टानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग; विजयी मिरवणुकांवर बंदी

Subscribe

कोरोनाच्या उद्रेकात देशातील पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकाल २ मे रोजी आहे. मात्र, मतमोजणीच्या आधीच निवडणूक आयोगाने काही सूचना केल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही जल्लोषावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. सोमवारीच मद्रास उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यावरुन निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते.

निवडणुका पार पडल्यानंतर त्या त्या राज्यात कोरोनाचा विस्फोट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगामुळे कोरोना फैलावला, अशी टीप्पणी केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने पाच राज्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. निकालानंतर, विजयी उमेदवाराला केवळ दोनच लोकांसह त्यांचं विजयी झालेलं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. निवडणूक आयोग इतर निर्बंध देखील लागू करू शकेल, लवकरच संपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या चार राज्यांमध्ये आणि पुडुचेरी या केंद्रशासित राज्यामध्ये निवडणूक पार पडली आहे. याचा निर्णय येत्या २ मे रोजी होणार आहे. दरम्यान, चार राज्यांमधील मतदान पार पडलं असून बंगालमध्ये आठव्या टप्प्यातील मतदान अजून बाकी आहे. अशातच निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने फटकारलं

कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी फटकारलं होतं. मद्रास उच्च न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी निवडणूक आयोग पूर्णपणे जबाबदार आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारच्या प्रचार सभांवर बंदी घातली नाहीय. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी एकत्र येत राहिले.

- Advertisement -

याशिवाय, उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी संपूर्ण आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. या दिवशी जर काही चुका झाल्या तर न्यायालय मोजणीवरच बंदी घालेल, असा इशारा न्यायालयाने दिला होता.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -