मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन मतदान करत नसाल तर सावध व्हा, निवडणूक आयोगाने बनवली खास योजना

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 67.40 टक्के नोंदणीकृत मतदारांनी शहरी भागात मतदान केले. देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये कमी प्रमाणात मतदान झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Election Commission has made a special plan for who are not voting on polling day
मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन मतदान करत नसाल तर सावध व्हा, निवडणूक आयोगाने बनवली खास योजना

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन आराम करत असाल आणि मतदान न करणाऱ्यांसाठी खास योजना तयार केली आहे. निवडणुकीच्या दिवशी मोठ्या कंपन्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. शहरी भागातील मतदारांची उदासीनता दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. निवडणूक आयोग (EC) सर्व केंद्र आणि राज्य सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

निवडणूक आयोग आपल्या स्थानिक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत सरकारी विभाग, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी कंपन्यांना नोडल अधिकारी नेमण्यास सांगेल जे मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. दरम्यान एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले आहे की, आम्ही नियोक्त्यांना विनंती करू की, ज्यांनी मतदान केले नाही अशा कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या विशेष मतदार जागृती कार्यशाळेत पाठवावे. शहरी भागातील मतदारांच्या उदासीनतेचा सामना करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे

मतदानासाठी लोकं रजा घेतात परंतु मतदान करत नाहीत हे दुर्दैव आहे. त्यांचे नाव मतदार नसलेल्यांच्या यादीत यावे, असे कोणालाच आवडणार नाही. आम्हाला आशा आहे की मतदान न केल्यावर ओळख पटवून कार्यशाळेसाठी पाठवण्याची कारवाई कर्मचार्‍यांच्या उदासीनतेला परावृत्त करेल.

मतदानासाठी कायद्याने सशुल्क रजा

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 135B नुसार मतदान करण्यासाठी कर्मचार्‍यांना सशुल्क रजा उपलब्ध आहे , जो कोणताही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही कंपनीमध्ये काम करत आहे आणि संसद किंवा विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला यासाठी एक दिवसाची पगारी रजा मिळते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 च्या कलम 25 अन्वये राज्य आणि केंद्र सरकार नेहमी मतदानाचा दिवस सशुल्क सुट्टी म्हणून सूचित करतात. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या हक्काबाबत जागरुकता असूनही शहरी भागात मतदारांची उदासीनता सर्वाधिक आहे.

देशातील शहरी भागात सर्वात कमी मतदान

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 67.40 टक्के नोंदणीकृत मतदारांनी शहरी भागात मतदान केले. देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये कमी प्रमाणात मतदान झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा : विमानात मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना खाली उतरवा, DGCA च्या विमान कंपन्यांना सूचना