Homeदेश-विदेशDelhi Assembly Election 2025 : प्रचार तोफा थंडावल्या, आयोगाने एक्झिट पोलवर घातले...

Delhi Assembly Election 2025 : प्रचार तोफा थंडावल्या, आयोगाने एक्झिट पोलवर घातले निर्बंध

Subscribe

 दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आज (3 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 5 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्यात येतील. मात्र यावर आता निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आदेश काढले आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आज (3 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 5 फेब्रुवारीला दिल्लीतील 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्यात येतील. मात्र यावर आता निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आदेश काढले आहेत. (Election Commission imposes restrictions on exit poll results ahead of Delhi Assembly elections)

मतदारांना निष्पक्षपणे मतदान करता यावे म्हणून निवडणूक आयोग मतदानापूर्वी आणि मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करण्यास मनाई करतो. एक्झिट पोलचे निकाल मतदानावर परिणाम करू शकतात, अशी शक्यता आहे, म्हणूनच आयोग त्यावर कडक नियंत्रण ठेवतो. याचपार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवर निर्बंध घातले आहेत. या संदर्भात दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एक आदेश देखील जारी केला आहे.

हेही वाचा –  Rahul Gandhi : राहुल गांधींनी मागितली मंत्र्यांची माफी, नेमकं काय घडलं?

निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले की, भारतीय निवडणूक आयोग, 1951 च्या कलम 126अ च्या उपकलम (1) अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून, सदर कलमाच्या उपकलम (2) च्या तरतुदींनुसार, 5 फेब्रुवारी 2025 (बुधवार) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या कालावधीला विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या कालावधीत 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात कोणताही एक्झिट पोल करणे आणि त्याचे निकाल प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रसारित करणे प्रतिबंधित असेल, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मतदानासाठी 13 हजार 766 पोलिंग बुथ 

दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी 13 हजार 766 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. एकूण 83.76 लाख पुरुष, 72.36 लाख महिला आणि 1267 तृतीयपंथी मतदार आहेत. 733 मतदान केंद्रे दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदान करण्याच्या सुविधेअंतर्गत, 7553 पात्र मतदारांपैकी 6980 लोकांनी आधीच मतदान केले आहे. घरबसल्या मतदान करण्याची सुविधा 24 जानेवारीपासून सुरू झाली असून उद्यापर्यंत (4 फेब्रुवारी) सुरू राहणार आहे.

हेही वाचा – Parliament Session 2025 : तुम्हाला गोंधळच घालायचा असेल तर मी, लोकसभाध्यक्ष का भडकले वाचा –