घरताज्या घडामोडीAssembly Elections 2022: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तातडीची बैठक, AIIMS-ICMR कडून मागितल्या...

Assembly Elections 2022: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तातडीची बैठक, AIIMS-ICMR कडून मागितल्या सूचना

Subscribe

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत केंद्रि निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालय ते ICMR आणि AIIMS च्या संचालकांशी चर्चा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक निवडणूक आयोगाने घेतली असून निवडणुका सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व बाबींवर सूचनाही मागण्यात आल्या आहेत.

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज पार पडली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सूचना देखील जारी केल्या आहेत. ICMRचे संचालक बलराम भार्गव आणि AIIMSचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाशी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांशी संबंधित इतर गोष्टींवर सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.

- Advertisement -

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाच्या सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये निवडणुका कशा घ्याव्यात आणि सुपर स्प्रेडरने कोरोना विषाणू पसरवू नये, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग या बैठकांद्वारे कोरोनाशी संबंधित सर्व माहिती गोळा करत आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणूक खर्चात वाढ

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार नव्या खर्चाच्या मर्यादेचे नोटिफिकेशन हे केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणूकीसाठी निवडणकू खर्चाची मर्यादा ही ७० लाख इतकी होती. ही मर्यादा आता ९५ लाख इतकी करण्यात आली आहे. तर विधानसभा निवडणूकांसाठी आधीची निवडणूक खर्चाची मर्यादा ही २८ लाख होती, या मर्यादेत वाढ करत ही मर्यादा ४० लाख इतकी करण्यात आली आहे. केंद्राने एका परिपत्रकाच्या माध्यमातून याबाबतची घोषणा केली आहे.


हेही वाचा : Election expenditure : लोकसभा, विधानसभा निवडणूक खर्चात वाढ, मोदी सरकारचा निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -